शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 21:35 IST

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली याबद्दलची घोषणा

Ajit Pawar Dhananjay Munde, NCP: राज्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीचे महायुती सरकार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ४ पैकी केवळ १ जागा जिंकता आली. पण विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांनी ते अपयश धुवून टाकले. राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे असे दोनही उमेदवार निवडून आणले. आता सर्वच पक्ष विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर लवकरच अजित पवार बारामतीत जाणार आहेत. त्याआधी आज अजितदादांच्या टीममधील खास नेते असलेले कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पक्षातील एक महत्त्वाची नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काही महत्त्वाची माहिती दिली. सध्या कॅबिनेट मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावर आता नवीन आणि महत्त्वाची जबाबदारी देण्यात येत असल्याची त्यांनी घोषणा केली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या मान्यतेने राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची निवड केल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यासोबतच प्रदेश प्रवक्ते पदी नवनिर्वाचित आमदार राजेश विटेकर यांची निवड केल्याचीही घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली.

पुढे तटकरे म्हणाले, "सोमवार दिनांक २२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा अहिल्यानगर दौरा निश्चित करण्यात आला असून या दौऱ्यात महिलांशी थेट संवाद साधणार असल्याचा उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केला आहे. सकाळी पारनेर, दुपारी अहिल्यानगर शहर, श्रीगोंदा आणि संध्याकाळी कर्जत जामखेड याठिकाणी अजितदादा पवार महिलांच्या समस्या, अडचणी समजून घेणार आहेतच शिवाय लाडकी बहिण योजना, तीन सिलेंडर मोफत, विद्यार्थिनींना मोफत शिक्षण याबाबतही माहिती देऊन त्यांचे याबाबत मत जाणून घेऊन सरकारच्या माध्यमातून त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत."

"६४ वर्षाच्या महाराष्ट्राच्या या राजकीय आणि सामाजिक प्रवासात शिव - शाहू - फुले - आंबेडकरांच्या या महाराष्ट्राने वेगवेगळे अर्थसंकल्प मांडलेले पाहिले... अनुभवले. कृषीप्रधान असलेल्या महाराष्ट्रात कृषीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले. परंतु ज्या कारणासाठी वैचारिक संघर्ष महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी दिला त्या महिलांसाठी अभिनव योजना अजितदादा पवार यांनी यावेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात दिली. त्या लाडक्या बहिण योजनेचे भव्य स्वागत महाराष्ट्रातील महिला भगिनींनी केला", असे समाधान सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेsunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस