शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

शिंदेंच्या आमदारांशिवाय अजित पवारांनी घेतली बैठक; आमदार म्हणाला, 'आमच्यावर वारंवार अन्याय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:25 IST

Ajit Pawar News: रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीबद्दल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या तीन आमदारांनाही कळवण्यात आले नाही. 

Mahayuti News: रायगडमध्ये महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना यांच्यात सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या निमित्ताने हे दिसून आलं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच मंगळवारी (११ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील शिवसेनेच्या तिन्ही आमदारांना बोलण्यात आले नाही. त्यामुळे तिन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, बैठकीला न बोलवून आमचा अवमान केल्याचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी म्हणाले.    

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या डीपीडीसीच्या बैठकीला मंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. मात्र, मंत्री भरत गोगावले हेही नव्हते. 

शिंदेंच्या आमदाराने व्यक्त केली नाराजी

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी म्हणाले, "आम्हाला निमंत्रण नव्हतं. खरं म्हणजे अजित पवारांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. आदिती तटकरे या त्या बैठकीला उपस्थित होत्या. पण, आमच्या तिन्ही आमदारांनाही दुरान्वयानेही कल्पना नाही. निरोप पण आलेला नाही. यासंदर्भात मी डीपीओकडून माहिती घेतली. ते त्या बैठकीला उपस्थित होते. जिल्हाधिकारी व्हर्च्युअली उपस्थिती होते." 

'भरत गोगावलेंना पालकमंत्री करावे'

"जिल्ह्यातील आमच्या कोणत्याही आमदाराला कोणतीही सूचना नव्हती. खरंतर ही बैठक अधिकृत की अनधिकृत आम्हाला माहिती नाही. पण, यासंदर्भात आमचे नेते एकनाथ शिंदेंसोबत आम्ही निश्चितपणे चर्चा करणार. आमच्यावर वारंवार होणाऱ्या अन्यायाबद्दल न्याय मिळाला पाहिजे. रायगडमध्ये पालकमंत्र्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाही. आमची आग्रही मागणी आहे की, भरत गोगावले पालकमंत्री व्हायला हवेत", अशी मागणी आमदार दळवी यांनी पुन्हा एकदा केली.  

"आजच्या बैठकीला न बोलवून त्यांना काय साध्य करायचं आहे, मला माहिती नाही. न बोलवून आमचा अवमान झाला, असं मी नक्की म्हणेन. मला असं वाटतं की बैठक अधिकृत नसावी, कारण अधिकृत असती, तर आम्हा आमदारांना बोलावलं असतं", असे म्हणत आमदार महेंद्र दळवी यांनी बैठकीवरून टोला लगावला. 

"सार्वजनिक विकास कामासंदर्भात आढावा घेऊन ही बैठक घेतली जाते. जर अशा पद्धतीने बैठक होत असेल, तर निश्चितपणे आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आणि सर्व आमदार निर्णय घेऊ", अशी भूमिका आमदार महेंद्र दळवी यांनी मांडली. 

"आम्हाला बैठकीबद्दल कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. आम्ही एकनाथ शिंदेंसोबत चर्चा चर्चा करू", असे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :MahayutiमहायुतीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे