महायुतीत अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही; संभाव्य उमेदवारांची नावे समोर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:28 PM2023-11-17T12:28:05+5:302023-11-17T12:28:55+5:30

अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत. 

Ajit Pawar group in Mahayuti insists for 9 Lok Sabha seats; Names of potential candidates? | महायुतीत अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही; संभाव्य उमेदवारांची नावे समोर?

महायुतीत अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही; संभाव्य उमेदवारांची नावे समोर?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. राज्यात सध्या जागा वाटपाच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत लोकसभेच्या नऊ जागांसाठी अजित पवार गट आग्रही आहे. तसेच, अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणीच्या सूचना दिल्या आहेत. 

राष्ट्रवादीकडील चार  जागांव्यतिरिक्त आणखी पाच जागांची घटक पक्षांकडे मागणी केली आहे. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. सध्या राष्ट्रवादीकडे लोकसभेच्या चार जागा आहेत. बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार जागा आहेत. या जागा सोडून अजित पवार गट धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया, छत्रपती संभाजीनगर या पाच जागांसाठी आग्रही आहे.  
रायगड लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार गटाकडून संभाव्य उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांचे नाव समोर येत आहे. या जागेवर भाजपने सुद्धा दावा केला आहे. रायगडचा पुढचा खासदार भाजपचाच असेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले. महायुतीला बाजूला ठेवून रायगडमधून धैर्यशील पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याचे चंद्रशेखर बावनकुळे संकेत यांनी दिले. यामुळे आता अजित पवार गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. 

संभाव्य उमेदवारांची नावे
बारामती - सुनेत्रा पवार
सातारा - रामराजे नाईक निंबाळकर
रायगड - सुनिल तटकरे
शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील 
दक्षिण मुंबई - काँग्रेसमधील बडा चेहरा 
परभणी- राजेश विटेकर
भंडारा गोंदिया - प्रफुल्ल पटेल
धाराशिव - राणा जगजितसिंह 
छत्रपती संभाजीनगर - सतीश चव्हाण

आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी 
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजप, काँग्रेस, मनसे या पक्षांसह अजित पवार गटानेही लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. तसेच, गेल्या काही दिवसांपूर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीदरम्यान ही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Ajit Pawar group in Mahayuti insists for 9 Lok Sabha seats; Names of potential candidates?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.