मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. विधिमंडळ नेतेपदी एकमताने सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे कोणाला द्यावीत यावर अद्याप निर्णय नाही. परंतु या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांचं नाव आघाडीवर घेतले जात आहे. पक्षाचे नेतृत्व भविष्यात कुणी करावे यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. त्यातच मागील २ दिवसांपासून राज्यभरातील पदाधिकारी आणि जवळपास ३० आमदारांनी वरिष्ठ नेत्यांकडे पत्र पाठवून सुनेत्रा पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या निकालानंतर ९ फेब्रुवारीला पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. त्या बैठकीत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत नावाचा प्रस्ताव ठेवला जाईल. या नावाला मान्यता मिळाल्यानंतर अधिकृतपणे राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाईल. सध्या पक्षात प्रफुल पटेल कार्यकारी अध्यक्ष आणि सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये दादांचा उत्तराधिकारी कोण याची चर्चा सुरू होती. मोठ्या प्रमाणात पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आमदारांनी सुनेत्रा पवारांना नेतृत्व द्यावे अशी मागणी होत आहे. ३० आमदारांनी लिखित स्वरुपात त्यांचे समर्थन सुनेत्रा पवारांना दिले आहे. अजित पवारांचा राजकीय वारसा आणि त्यांची विचारधारा त्या पुढे घेऊन जाऊ शकतात असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
पक्षात संघटनात्मक होणार बदल
सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीत संघटनात्मक बदल होतील. संघटनेत प्रफुल पटेल कार्यकारी अध्यक्ष, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष म्हणून भूमिका निभावतील. वाय.पी त्रिवेदी राष्ट्रीय कोषाध्यक्ष, एस.आर कोहली राष्ट्रीय महासचिव, प्रशासन प्रमुख असतील. त्याशिवाय बृजमोहन श्रीवास्तव हे राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळतील. सुबोध मोहिते राष्ट्रीय महासचिव आणि सैय्यद जलालुद्दीन अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष म्हणून काम करतील. परंतु दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सध्या जोरदार चर्चा आहे.
Web Summary : Following Ajit Pawar's death, Sunetra Pawar is favored for NCP leadership. Thirty MLAs support her for national president. Organizational changes are expected post-appointment, with key leaders retaining positions. Merger talks continue.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद, सुनेत्रा पवार को एनसीपी नेतृत्व के लिए समर्थन मिल रहा है। तीस विधायकों ने उन्हें राष्ट्रीय अध्यक्ष बनाने का समर्थन किया है। नियुक्ति के बाद संगठनात्मक बदलाव की उम्मीद है, प्रमुख नेता पद पर बने रहेंगे। विलय की बातचीत जारी है।