शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादा शेवटपर्यंत कामात होते व्यग्र; अपघातस्थळी कागदांचा ढीग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 06:58 IST

Ajit Pawar Death News: नेहमी शासकीय बैठकांमध्ये, राजकीय कार्यक्रमात आणि लोकांच्या गराड्यात राहणारे अजित पवार बुधवारी हे सगळे सोडून निघून गेले. मात्र, अजित पवारांच्या निधनापर्यंतही ते आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले.

मुंबई - नेहमी शासकीय बैठकांमध्ये, राजकीय कार्यक्रमात आणि लोकांच्या गराड्यात राहणारे अजित पवार बुधवारी हे सगळे सोडून निघून गेले. मात्र, अजित पवारांच्या निधनापर्यंतही ते आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. निधनाच्या दिवसाची सकाळ आणि त्याआधीचा संपूर्ण दिवस अजित पवार कामात व्यस्त होते.

नेहमी भल्या सकाळी कामाला सुरुवात करण्याचा पायंडा त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. निधनाच्या एक दिवस आधी मंगळवारीही अजित पवार नऊ वाजताच मंत्रालयात आले होते. सकाळी ९ ते ९:३० पर्यंत त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभाग आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला. अर्थसंकल्प जवळ आल्याने त्यांनी ९:३० वाजता नियोजित बैठक घेतली. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पक्षाच्या मंत्र्यांबरोबर ११:३० वाजता त्यांनी मंत्रिमंडळ बैठकीपूर्व चर्चा केली. अनेक मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर होते. मात्र, प्रशासकीय कामाला महत्त्व देणारे अजित पवार उपस्थित राहिले. बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीतही ते सहभागी झाले होते.

निवडणूक प्रचारासाठी घेणार होते चार सभा- अजित पवार दर मंगळवारी आपल्या मंत्री आणि आमदारांची 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी बैठक घेत असत. मंत्रालयातील बैठका आटोपून देवगिरीवर परतलेल्या अजित पवारांनी त्यानंतर नेहमीप्रमाणे मंत्री आणि आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांनी पक्षाची तयारी आणि इतर बाबींचा आढावा घेतला.

- ही बैठक संपवून रात्री ते मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी गेले. तिथे राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकेत भाजप आणि अजित पवार गट कुठे एकत्र येऊ शकतो याबाबत चर्चा करण्यात आल्याचे समजते. रात्री ही बैठक आटोपून अजित पवार देवगिरीवर परतले. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून ते बारामतीकडे जायला तयार झाले. बारामतीच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी अजित पवारांच्या निरावागज, पणदरे, करंजेपूल आणि सुपा अशा चार सभा होणार होत्या.

वातावरणाचा अंदाज घेऊन अजित पवार निघाले होतेविमानाने सकाळी लवकर बारामतीला निघायचे होते. राज्यात थंडी वाढल्याने सकाळी बहुतांश भागात धुके असते. त्यामुळे विमान उतरण्यासाठी बारामतीतील वातावरण कसे आहे याची माहिती घेण्यात आली. वातावरण चांगले असल्याचा निरोप आल्यानंतर ७:३० वाजता अजित पवार देवगिरीवरून विमानतळाकडे जायला निघाले. निघताना त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि काही निवेदनेही आपल्यासोबत घेतली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Ajit Pawar: Engaged in Work Until the End; Papers at Site

Web Summary : Ajit Pawar remained dedicated to his work until his last day. He reviewed law and order, held meetings on budget and elections, and planned rallies. Despite a busy schedule, he prioritized administrative duties and party preparations before his untimely departure.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार