शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद निवडणूक होणार की पुढे ढकलणार? राज्य निवडणूक आयोग आज निर्णय घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 06:16 IST

Ajit Pawar Death News: राज्यात १२ जिल्हा परिषदांची निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीला होणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ती पुढे ढकलली जाणार, याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग गुरुवारी घेणार आहे. 

मुंबई - राज्यात १२ जिल्हा परिषदांची निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारीला होणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ती पुढे ढकलली जाणार, याबाबतचा निर्णय राज्य निवडणूक आयोग गुरुवारी घेणार आहे. 

आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी निवडणूक पुढे ढकलली असल्याच्या वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला. निवडणुकीशी संबंधित विविध बाबींचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

एरवी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी तीन ते चारच दिवस दिले जातात. यावेळी २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार आहे. याचा अर्थ प्रचाराला सात दिवस देण्यात आले आहेत. 

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा ३० जानेवारीपर्यंत होणार नाहीत. तरीही प्रचारासाठी चार दिवस मिळणार आहेत. एवढा कालावधी प्रचारासाठी पुरेसा असल्याने निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजीच घ्यावी, असा विचार आयोग करत आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना मोठ्या नेत्याचे निधन झाल्याचा प्रसंग या आधी उद्भवलेला नव्हता. असे पहिल्यांदाच घडत असल्याने सर्व बाबींचा विचार करून गुरुवारी निर्णय घेऊ, असे आयोगाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

अजितदादांच्या निधनाचे असेल प्रचारावर सावटविशेषत: पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारात कालपर्यंत होणारे आरोप-प्रत्यारोप, त्यातून येणारी कटुता प्रचाराच्या उर्वरित काळात दिसणार नाही. त्याऐवजी प्रचार भावनिक अंगानेच अधिक केला जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : District Council Election: To Happen or Postpone? State Election Commission Decides Today

Web Summary : The State Election Commission will decide today whether to postpone the district council elections following a leader's death. Despite mourning, sufficient campaign time remains, potentially allowing the election to proceed as scheduled on February 5th.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५Maharashtraमहाराष्ट्र