शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दादा! अलविदा! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चटका लावणारी धक्कादायक एक्झिट, आज अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 06:38 IST

Ajit Pawar Death News: राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांची ही अकाली एक्झिटही अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली.

राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (वय ६६) यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यांची ही अकाली एक्झिटही अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. वक्तशीर, बोलण्यात कडक पण तितकाच मिश्कील असलेला ‘दादा माणूस’ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. बुधवारी सकाळी गोजुबावी (ता. बारामती) येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान सकाळी पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. यात उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह पीएसओ विदिप जाधव, वैमानिक कॅप्टन सुमित कपूर, फर्स्ट ऑफिसर शांभवी पाठक, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. बारामतीच्या इतिहासातील बुधवार हा ‘काळा दिवस’ ठरला.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी उपमुख्यमंत्री पवार हे बारामतीत येणार होते. बुधवारी सकाळी मुंबई येथून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ कंपनीच्या ‘लिअरजेट ४५’ या विमानातून ते बारामतीकडे येत होते. आठ वाजून ५० मिनिटांनी त्यांची बारामती येथील लँडिंगची वेळ होती. मात्र, तत्पूर्वीच विमानतळावरील धावपट्टीच्या सुरुवातीलाच त्यांचे विमान अपघातग्रस्त झाले. विमान धावपट्टी सोडून बाजूला एका झाडावर जाऊन पडले. याच वेळी विमानाचा स्फोट झाला. यात संपूर्ण विमानाचे तुकडे झाले. 

सकाळी ११ वा. अंत्यसंस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. 

पंतप्रधान उपस्थित राहणारअजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.   

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. २८ ते ३० जानेवारी या कालावधीत शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. 

विमान वाहतुकीचे आजचे नियोजन हवाई दलाकडेअजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधानांसह देशभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बारामती विमानतळावर मोठ्या संख्येने विमानांची ये-जा होणार आहे. परिस्थिती लक्षात घेऊन विमान वाहतुकीचे नियोजन करण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने भारतीय हवाई दलाला केली आहे. 

लोकसभेत अजित पवार यांना श्रद्धांजलीलोकसभेने बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया तसेच अलीकडेच निधन झालेल्या लोकसभेच्या पाच माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी लोकसभा सदस्य असलेले अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली.

बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेने मी अत्यंत व्यथित झालो आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

उपमुख्यमंत्री अजित पवार हे तळागाळातील लोकांशी समर्पित आणि जोडलेले व्यक्तिमत्त्व होते. जनतेची सेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर असलेले कष्टाळू, समर्पित नेते म्हणून त्यांचे नेहमीच स्मरण केले जाईल. - आचार्य देवव्रत, राज्यपाल, महाराष्ट्र

अजित पवार लोकनेते होते. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती.  त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे. मनाला चटका लावणार आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अजितदादांचे निधन हे अत्यंत वेदनादायी, मनाला चटका लावणारे आहे. शिस्तबद्धता, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर त्यांची पकड होती. या घटनेने अभ्यासू-मार्गदर्शक मोठा भाऊ गमावला आहे. - एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

घड्याळानेच पटली मृतदेहाची ओळखसर्व मृतदेह अत्यंत जळालेल्या अवस्थेत आढळून आले. अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळामुळे पटली. ‘घड्याळ’ हेच चिन्ह घेऊन अजित पवारांचा संपूर्ण राजकीय प्रवास झाला आणि त्याच घड्याळाने त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणे, हा नियतीचा क्रूर खेळ असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 

पायलटची चूक होती की तांत्रिक बिघाड?अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? या घटनेमागे तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 'बंबार्डिअर लिअरजेट ४५ एक्सआर' या ८ सीटर विमानाला लँडिंगदरम्यान हा अपघात झाला. विमान लँड करताना पायलटला दिसणाऱ्या धावपट्टीचा अंदाज घेऊनच विमान उतरवावे लागते. बाहेरून त्यांना मदत देणे शक्य होत नाही. त्यामुळे ही पायलटची चूक होती की, ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास सध्या सुरू आहे.

काय आहेत शक्यता?तज्ज्ञांच्या मते, विमान उतरवताना वैमानिकाला प्रामुख्याने 'व्हिज्युअल ॲप्रोच' घ्यावा लागतो. म्हणजेच, रनवे डोळ्यांनी स्पष्ट पाहूनच विमान जमिनीवर उतरवावे लागते. या ठिकाणी विमान लँडिंगसाठी इतर अत्याधुनिक तांत्रिक प्रणालींची मदत मर्यादित असते. त्यामुळे धावपट्टीचा अंदाज घेण्यात वैमानिकाची चूक झाली असावी किंवा ऐनवेळी काही तांत्रिक अडचण उद्भवली असावी.

English
हिंदी सारांश
Web Title : Shocking! Deputy CM Ajit Pawar Dies in Plane Crash, Funeral Today

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar tragically died in a plane crash near Baramati. The accident, also claiming four others, occurred during landing. Funeral scheduled for Thursday with state honors. Three-day state mourning declared. Pilot error or technical fault suspected as cause.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPlane Crashविमान दुर्घटनाBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार