"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 05:41 PM2020-06-27T17:41:10+5:302020-06-27T18:08:21+5:30

ज्या नेत्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्याच्याविषयी काय बोलायचे. लायकी पाहून बोलावे, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला.

ajit pawar criticized bjp mlc gopichand pdalkar on sharad pawar statment | "लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

"लायकी पाहून बोलावं, सूर्याकडे पाहून थुंकल्यास...", अजित पवारांची गोपीचंद पडळकरांवर सडकून टीका

Next
ठळक मुद्देगेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपाचे  विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांच्याबद्दल एक वादग्रस्त  विधान केले होते.भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साताऱ्यात भेट घेतली.

सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे.

ज्या नेत्याचे डिपॉझिट जप्त झाले. त्याच्याविषयी काय बोलायचे. लायकी पाहून बोलावे, सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते, अशा शब्दांत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला. साताऱ्यातील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शरद पवार यांना महाराष्ट्र आणि देश ओळखतो. ज्या माणसाची योग्यता नाही, त्याने काय बोलावे. सूर्याकडे पाहून थुंकल्यास थुंकी तोंडावर उडते, हा प्रकार आहे. मोठा नेता असता तर गोष्ट वेगळी. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यावरून तुम्ही ओळखू शकता, त्यांच्या विधानाला किती महत्व द्यायचे. यावर उत्तर देताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या तोंडाला फेस आला, असे सांगत अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. 

याचबरोबर, पडळकरांसारख्या पात्रता नसलेल्या लोकांना डोक्यावर घेतल की असं होत. लोकच त्यांना जागा दाखवतील. प्रत्येकाने लायकी पाहून बोलावे. शब्द जपून वापरावे, असेही अजित पवार म्हणाले. याशिवाय, भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साताऱ्यात भेट घेतली. याबाबत अजित पवार म्हणाले, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंह राजे भेटले त्यांचे प्रश्न घेऊन आले होते. ते प्रश्न ऐकून घेतले.

दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपाचे  विधानपरिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांच्याबद्दल एक वादग्रस्त  विधान केले होते. यावरून राजकीय वाद सुरू झाला आहे. 'शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत. त्यांच्याकडे कुठलेही व्हिजन नाही. त्यांनी छोट्या समूहांचा आपल्या राजकारणासाठी वापर करून घेतला', असे विधान गोपीचंद पडळकर यांनी केले होते. 

आणखी बातम्या...

अमेरिकेत कोरोनाचा उद्रेक! रुग्णांची संख्या दोन कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता

'रयत'च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर 

वीजबिल दरवाढीविरोधात भाजपाचा डोंबिवलीत मोर्चा, पण फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा

Web Title: ajit pawar criticized bjp mlc gopichand pdalkar on sharad pawar statment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.