शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:33 IST

कोणीही दोषी असला तर सोडायचं नाही, ही आमची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

NCP Ajit Pawar: पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी आणि सरपंच खून प्रकरणातील संशयित वाल्मीक कराडवर आता मकोका कायद्यांतर्गतही कारवाई केली जाणार आहे. खंडणीच्या प्रकरणात कोर्टाने आज वाल्मीक कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर एसआयटीने हत्या प्रकरणात त्याचा ताबा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारचा भूमिका स्पष्ट करत आम्ही कोणालाही सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. "आरोपी सत्ताधारी पक्षाचा असो, विरोधी पक्षाचा असो, त्रयस्थ असो किंवा त्याचा राजकारणाशी संबंध असेल तरी त्याला थारा दिला जाणार नाही," अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे.

वाल्मीक कराडवरील कारवाईवर बोलताना अजित पवार म्हणाले की, "संतोष देशमुख हत्या प्रकरणात कोणीही दोषी असलं तरी हयगय न करता त्याच्यावर कारवाई करायची, हे पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी ठरवलेलं होतं. त्या दिवसापासून या गोष्टीला सुरुवात झाली आहे. महिना होऊन गेल्याने देशमुख यांच्या कुटुंबातील लोकही चिंतेत होते की या प्रकरणात काही कारवाई होणार आहे की नाही. मात्र पोलीस यंत्रणा त्यांचे काम करत आहे. सीआयडी आणि एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फतही या प्रकरणात चौकशी होणार आहे. कोणीही दोषी असला तर सोडायचं नाही, ही आमची भूमिका आहे. ही निर्घृण हत्या आहे आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी घटना कोणीही खपवून घेणार नाही. चौकशीत ज्याचे धागेदोरे सापडतील, त्या प्रत्येकावर कारवाई होईल," असा शब्द अजित पवार यांनी दिला आहे.

कराडला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार

न्यायालयीन कोठडीत गेलेल्या वाल्मीक कराडचा ताब्यात घेण्याची प्रक्रिया एसआयटीकडून तात्काळ सुरू करण्यात आली आहे. तसंच उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार असून सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्याची सखोल चौकशी करण्यासाठी कराडला पोलीस कोठडी मिळावी, अशी विनंती एसआयटीकडून कोर्टाकडे केली जाणार आहे. त्यामुळे आज खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वाल्मीकला उद्या मोक्का कोर्टाकडून पोलीस कोठडी सुनावली जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडAjit Pawarअजित पवारbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडCrime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडे