शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

Ajit Pawar: अजित पवारच ठरणार हुकुमाचा एक्का? कोर्टाचा निकाल काहीही लागो; उलथापालथीकडे सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 07:46 IST

Ajit Pawar: येत्या महिन्याभरात राज्याच्या राजकारणात होऊ घातलेल्या उलथापालथीचे सर्वात मोठे लाभार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार ठरण्याची शक्यता आहे.

- सुनील चावके नवी दिल्ली : येत्या महिन्याभरात राज्याच्या राजकारणात होऊ घातलेल्या उलथापालथीचे सर्वात मोठे लाभार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार ठरण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी ‘अच्छे दिन’ वाट्याला येऊन अजित पवार राज्याच्या राजकारणात हुकुमाचा एक्का ठरू शकतात.

सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेल्या सत्तासंघर्षावर बहुप्रतिक्षित निकालाची घडी जवळ आल्यामुळे भाजप-शिवसेनेच्या गोटात चलबिचल वाढली आहे. निकाल आमच्याच बाजूने लागून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार स्थिर राहील, असा दावा करण्यात येत असला तरी १६ आमदारांच्या संभाव्य अपात्रतेच्या शक्यतेमुळे भाजप-शिवसेना गोटात  अस्वस्थता आहे. परिणामी, येत्या १५ मे पूर्वी कधीही लागू शकणाऱ्या या निकालापूर्वी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले असून सत्ताधारी भाजप-शिवसेना आणि विरोधी महाविकास आघाडीच्या नजरा अजित पवार यांच्यावर खिळल्या आहेत.शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे मनसुबे उघड करून या शक्यतेला तूर्तास विराम दिला असला तरी तो अजित पवार यांचा भाव वधारण्यात हातभार लावणाराच ठरणार आहे.

भाजपशी हातमिळवणी करण्यासाठी दडपणअजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करावी म्हणून त्यांच्यावर कमालीचे दडपण असल्याचे त्यांच्या निकटस्थ सूत्रांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी भाजपसोबत मजबुरीपोटी जायची वेळ आल्यास अजित पवार यांना भाजपश्रेष्ठींच्या अटी-शर्ती मान्य कराव्या लागतील. त्या स्थितीत त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण होईलच याची शाश्वती नाही. पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यास राज्यातील सत्ता शाबूत ठेवण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना महत्त्वाची खाती देण्याच्या शर्ती मान्य करण्याची वेळ भाजपवर  येऊ शकते.

शक्यता काय आहेत?- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता निर्माण झाल्यास महाविकास आघाडीकडून अजित पवार हेच मुख्यमंत्रिपदाचे निर्विवाद दावेदार ठरणार असल्याचे संकेत मविआच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिले आहेत.- दिल्लीतील भाजपश्रेष्ठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासाठी कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४० हून अधिक जागा जिंकणे अनिवार्य आहे. - राज्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अजित पवारांची साथ लाभल्याशिवाय भाजपला हे लक्ष्य साध्य करणे शक्य नाही.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी