अजितदादा अजूनही शांत नाहीत : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 15:56 IST2019-12-24T15:39:00+5:302019-12-24T15:56:52+5:30

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच ते भाजपकडे आले. म्हणूनच सत्ता स्थापन केली. मात्र, त्यांची अस्वस्थता कायमच राहिली. त्यांनी पुन्हा परतून जाण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ते अजूनही शांत नाहीत,ह्ण असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

Ajit Dada still not calm: Madhav Bhandari | अजितदादा अजूनही शांत नाहीत : माधव भंडारी

अजितदादा अजूनही शांत नाहीत : माधव भंडारी

ठळक मुद्देअजितदादा अजूनही शांत नाहीत : माधव भंडारी आम्ही कोणताही शब्द त्यांना दिला नव्हता

कऱ्हाड : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पक्षात अस्वस्थ होते. त्यामुळेच ते भाजपकडे आले. म्हणूनच सत्ता स्थापन केली. मात्र, त्यांची अस्वस्थता कायमच राहिली. त्यांनी पुन्हा परतून जाण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी ते अजूनही शांत नाहीत,ह्ण असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले.

कऱ्हाड येथे पत्रकारांशी संवाद साधताना भंडारी बोलत होते. यावेळी कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे तालुकाध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चरेगावकर यांची उपस्थिती होती.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना भंडारी म्हणाले, अजित पवारांना आम्ही कुठलाही शब्द दिलेला नव्हता. तेच आमच्याकडे आले होते अन् अजितदादांना आम्ही जेवढे ओळखतो त्यावरून ते बोलतात एक अन् करतात दुसरे, असा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी जे निर्णय घेतले, त्याबाबत तुम्हाला तेच चांगलं उत्तर देऊ शकतात, असेही ते म्हणाले.

 

Web Title: Ajit Dada still not calm: Madhav Bhandari