शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अजितदादांचा राजीनामा बॉम्ब; राष्ट्रवादीत खळबळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2019 06:47 IST

अचानक सोडली आमदारकी; विधानसभा निवडणुकीला मिळणार नवे वळण

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रचंड खळबळ उडवली. त्यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने गूढ वाढले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखाना स्थळी असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.शरद पवार ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यावरून घडामोडी मुंबईत घडताना अजितदादा मुंबईतच राजीनाम्याच्या तयारीत होते. त्यांच्या या हालचालींची शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कोणासही कल्पना नव्हती. उलट, मतदारसंघातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजित पवार तिकडे गेलेले आहेत, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून पत्रकारांना सांगण्यात येत होते. पवारांचा गड असलेल्या बारामतीचे अजित पवार हे पाचव्यांदा आमदार आहेत. त्या आधी ते एकदा खासदारदेखील होते. राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यात तेही एक आरोपी आहेत.कौटुंबिक वाद की पक्षात अवहेलना?काका शरद पवार यांच्याशी मतभेद झाल्याने अजित दादांनी आमदारकीचा राजीनामा दिला की प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना दिले जात असलेले महत्त्व त्यासाठी कारणीभूत ठरले की लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थच्या पराभवाची किनार या राजीनाम्याला आहे, या संदर्भात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.राजीनामा नेमका केव्हा दिला?शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता ते विधानभवनात गेले. त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या खासगी सचिवांकडे राजीनाम्याचे पत्र दिले. तेथूनच त्यांनी अध्यक्ष बागडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून ‘‘आपल्या कार्यालयाकडे मी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारावा,’’ अशी विनंती केली. बागडे यांनी पत्रकारांना सांगितले की, योग्य फॉरमॅटमध्ये अजित पवार यांनी राजीनाम्याचे पत्र दिल्याने मी तो स्वीकारला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयNCPराष्ट्रवादी काँग्रेस