शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ २०१९ मध्ये कार्यान्वित

By admin | Updated: June 20, 2015 00:34 IST

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी एक कोटी प्रवासी वाहतूक होणार आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पहिला टप्पा २०१९ मध्ये कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी एक कोटी प्रवासी वाहतूक होणार आहे. पूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर वर्षाला सहा कोटी प्रवासी वाहतूक होऊ शकणार आहे. विमानतळासाठी पात्रता विनंती प्रक्रियेसाठी ५ फेब्रुवारी २०१४ मध्ये निविदा सूचना प्रसिद्ध केली होती. जीएमआर एअरपोर्ट, मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रा. लि. , झुरिच एअरपोर्ट अँड वोलुप्टास डेव्हलपर्स व एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. सिडकोने निविदा मूल्यमापन समितीमार्फत अर्जांचे मूल्यमापन करून तयार करण्यात आलेला निरीक्षण अहवाल पुनरावलोकन व संमतीसाठी प्रकल्प निरीक्षण व अंमलबजावणी समितीकडे पाठविण्यात आले होते. चारही कंपन्या प्रकल्पासाठी पात्र ठरल्या आहेत. यामधील एक कंपनीने जगातील सातव्या क्रमांकाचा झुरिच विमानतळ विकसित केला आहे. जीएमआर व जीव्हीके या संस्थांनी दिल्ली व मुंबई विमानतळामध्ये जागतिक स्तरावरच्या सोयी -सुविधांची निर्मिती केली आहे. विन्सी कन्सेशन्स ही युरोपमधील सर्वात मोठी समूह कंपनी असून ती जगभरातील २३ विमानतळांचे व्यवस्थापन सांभाळते.