शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

मोदींच्या पत्राने सेवानिवृत्त सैनिकाला बळ : केंद्रीय विद्यालयात मिळाला मुलाला प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 13:52 IST

दीर्घकाळ वायुसेनेतील नोकरीच्या माध्यमातून देशसेवा केल्यानंतर आपल्या मुलाला केंद्रीय विद्यालयात चांगले शिक्षण मिळावे यासाठी एका माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहिले.

ठळक मुद्देमहिनाभर सुरू होता पत्रव्यवहार

राहुल शिंदे पुणे: दीर्घकाळ वायुसेनेतील नोकरीच्या माध्यमातून देशसेवा केल्यानंतर आपल्या मुलाला केंद्रीय विद्यालयात चांगले शिक्षण मिळावे यासाठी एका माजी सैनिकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहिले. तब्बल एक महिनाभर प्रवेशासाठी धरपडणाऱ्या या सैनिकाच्या मुलाला अखेर लोहगाव येथील केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळाला आणि त्याने सुटकेचा निःश्वास टाकला.उत्तर प्रदेश येथील इटावा शहरातील माजी सैनिक मनिष प्रकाश हे आपल्या मुलाला केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिलीत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करत होते. नियमानुसार प्रवेश अर्ज भरल्यानंतर शाळेच्या प्रवेश यादीत मुलाचा २१० वा कमांक होता.सेवानिवृत्त कर्मचारी असूनही प्रवेश मिळत नसल्यामुळे त्यांनी शाळेत चौकशी केली.त्यात प्रवेश अर्ज भरताना सेवा करताना किती ठिकाणी बदली झाली आहे,याचा उल्लेख करण्याचे राहून गेल्याचे समोर आले.परंतु,आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या मुलाला का ? प्रवेश मिळाला नाही तर केंद्रीय विद्यालयातील दर्जेदार शिक्षणापासून आपले मुलग वंचित राहील  वंचित राहिल. त्यामुळे त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पोस्टाने पत्र पाठवले. त्यात माझ्याकडून अर्ज भरताना नजर चुकीने काही त्रुटी राहून गेल्या,असाही उल्लेख केला.पंतप्रधान कार्यालयातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या या पत्राची दखल घेण्यात आली. तसेच पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवरही हे पत्र प्रसिध्द झाले. त्यावर शाळेकडून आणि विविध कार्यालयांकडून केलेल्या कार्यवाहीनंतर उत्तरे मनिष प्रकाश यांनी दिली. सुमारे महिनाभर यासंदर्भात पाठपुरावा केल्यानंतर पटेल यांच्या मुलाला केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 मध्ये प्रवेश मिळाला.केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळावा; यासाठी अनेक पालक धडपड करत असतात.खासदारकीच्या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठीही प्रयत्न केले जातात. परंतु,अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. त्यामुळे हताश होऊन पालक दुस-या शाळेत प्रवेश घेतात. मात्र मनिष प्रकाश यांनी न थांबता आपले प्रयत्न सुरूच ठेवले,अखेर त्यांच्या मुलाला केंद्रीय विद्यालय क्रमांक-2 मध्ये प्रवेश मिळाला.तसेच काही दिवसांनंतर केंद्रीय विद्यालय क्रमांक- 1 मध्ये सुध्दा प्रवेशासंदर्भात पत्रव्यवहार झाला. त्यांनी केंद्रीय विद्यालय क्रमांक 1 चा प्रवेश रद्द करून आता केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 मध्ये आपल्या मुलाचा प्रवेश केला आहे.-----------------------------------सैन्यात कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या कर्मचा-यांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळतो. मात्र, मी वीस वर्ष वायूसेनेत सेवा करून  सेवानिवृत्त झालो.केंद्रीय महाविद्यालयातील प्रवेश अर्जात किती ठिकाणी माझी बदली झाली,याची माहिती भरण्याचे माज्याकडून चूकून राहून गेले. त्यामुळे मुलाच्या प्रवेशात अडचणी आल्या.त्यानंतर मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले.तसेच वेळोवेळी पोर्टलवर पाठपुरावा केला.काही दिवसांनी माज्या मुलाला केव्ही-2 मध्ये प्रवेश मिळाला.मात्र,पत्रव्यवहार केल्यामुळे हा प्रवेश मिळाला की इतर कोणत्या करणामुळे प्रवेश झाला.हे ठामपणे मला सांगता येत नाही.- मनिष प्रकाश,माजी सैनिक

टॅग्स :PuneपुणेairforceहवाईदलNarendra Modiनरेंद्र मोदीSchoolशाळा