शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 13:10 IST

AI Camera: मोखाडा तालुक्यातील वेगवेगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविंद्र साळवेलोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : तालुक्यातील वेगवेगळ्या भागात संध्याकाळ आणि रात्रीच्या वेळी बिबट्याचे अनेकांना दर्शन घडले असून त्याने दुचाकीस्वारावर हल्ला केल्याची घटना देखील नुकतीच घडली. त्यामुळे तालुक्यातील नागरिक घाबरले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्याची माहिती नागरिकांना व्हावी म्हणून वनविभागाने वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या कॅमेरासह सायरन बसवला आहे. तसेच वेगवेगळ्या भागात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्ती पथके निर्माण केली असून नागरिकांचे प्रबोधनही करण्यात येत आहे.

मोखाडा तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून बिबट्याने वेगवेगळ्या भागात धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या बकऱ्या, वासरे आणि कुत्रे फस्त केले आहेत. त्यातच बिबट्याचे रोजच दर्शन घडत असल्याने नागरिकांसह शेतावर वास्तव्यास असलेल्या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात दहशत आहे. बिबट्याच्या वावराबाबत पाच ते सहा गावांमधून वनविभागाकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वनविभागाने गावोगावी जाऊन बिबट्यापासून कसे रक्षण करायचे याबाबत, नागरिकांचे प्रबोधन सुरू केले आहे. 

बिबट्याचा सततचा वावर असलेल्या वारघडपाड्याच्या पुढे एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला कॅमेरा बसवला आहे. त्याच्या माध्यमातून आता या प्राण्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाने दिली.

दिवसरात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त

वारघडपाडा येथे एआय तंत्रज्ञानाचा कॅमेरा व सायरन बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर दिवस-रात्र वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्तही असणार आहे. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील आणला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगी नंतर तो लावण्यात येणार आहे. गावोगावी शाळांसह वाडीवस्तीवर कर्मचारी आणि नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून काही नागरीक बिबट्याच्या वावराचा फेक व्हिडीओ तयार करत असल्याचे दिसून येत आहे. त्याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती मोखाड्याचे वनक्षेत्रपाल विनोद दळवी यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : AI Camera Alerts Villagers to Leopard Sightings with Siren

Web Summary : To protect villagers from frequent leopard sightings, an AI camera with a siren has been installed in Mokhada. Forest patrols are increased and awareness programs are conducted.