शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

शरद पवार नाही, शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकतील; भाजप खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 4:56 PM

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Sharad Pawar Jayant Patil ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली. या सभेतून विविध नेत्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही वळसे पाटलांना इशारा दिला. "पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. त्यांचे अनेक डाव आम्ही बघितले आहेत. कोणी तेल लावून तयार आहे असं म्हणलं होतं. वस्ताद हा नेहमी एक डाव राखून ठेवतो आणि तो डाव जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळे तेल लावलेले पैलवान चितपट होतात," असं जयंत पाटलांनी म्हटलं होतं. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यावरून नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सुजय विखे पाटील म्हणाले की, "जयंत पाटील हे शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात शेवटचा डाव टाकतील, असं म्हणतात. मात्र जयंत पाटील हेच शरद पवारांसोबत किती दिवस थांबणार आहेत, ते आधी विचारुन घ्या. नाही तर शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकायचे," असा टोला विखेंनी लगावला आहे.

मंचरमधील सभेत काय म्हणाले होते जयंत पाटील?  

राष्ट्रवादीतील फुटीनंतर पुणे जिल्ह्यातील मंचर इथं झालेल्या सभेत अजित पवार गटावर हल्लाबोल करताना जयंत पाटील म्हणाले की, "मधल्या काळात काही लोकं पक्ष सोडून गेले. जाताना सोबत पक्षाचे नाव आणि चिन्ह सुद्धा हिसकावून नेले. सुप्रीम कोर्टाने देखील ताशेरे ओढत पवार साहेबांच्या पक्षाला ७ दिवसाच्या आत चिन्ह द्या, असा आदेश निवडणूक आयोगाला दिला. लई विषय उघडला तर लई टोकाला जाईल. आम्ही बोलत नाही कारण आमची संस्कृती संयमाची आहे. शरद पवार साहेब हाच आपला पक्ष आहे, त्यामुळे बाकी गोष्टींची चिंता करायची आपल्याला गरज नाही. शून्याचे शंभर करण्याची ताकद आदरणीय पवार साहेबांकडे आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीकर देखील दचकून असतात. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक वर्षे काम केले आहे. त्यांचे अनेक डाव आम्ही बघितले आहेत. कोणी तेल लावून तयार आहे असं म्हणलं होतं. वस्ताद हा नेहमी एक डाव राखून ठेवतो आणि तो डाव जेव्हा बाहेर येतो तेव्हा सगळे तेल लावलेले पैलवान चितपट होतात," असा इशारा पाटील यांनी विरोधकांना दिला.

दरम्यान, "नैतिकतेचे अधिष्ठान घेऊन काम करणाऱ्यांचे मागे परमेश्वर देखील ताकद उभी करतो. त्यामुळे बूथ कमिटी मजबूत करण्याचे काम करा. घराघरात पोहोचा. समोरून प्रचंड शक्ती तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न करेल, पण डगमगू नका. महाराष्ट्र धर्म वाचविण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकविण्यासाठी एकजुटीने लढूयात," असं आवाहन जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलAhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेBJPभाजपाSharad Pawarशरद पवार