‘त्या’ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 04:03 IST2018-07-19T04:03:09+5:302018-07-19T04:03:26+5:30

निकृष्ट दर्जाची बियाणे विकणाऱ्या कुही तालुक्यातील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून ते केंद्र बंद आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

 The 'Agricultural Service Center's License Cancellation' | ‘त्या’ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

‘त्या’ कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

नागपूर : निकृष्ट दर्जाची बियाणे विकणाऱ्या कुही तालुक्यातील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून ते केंद्र बंद आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
संजय सावकारे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, अमिन पटेल, बसवराज पाटील, सुरेश धानोरकर, विजय वडेट्टीवार, अमर काळे, अस्लम शेख यांनी विदर्भात बंद असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यात येत असून शेतकºयांची फसवणूक होत असल्याची बाब उपस्थित केली होती.

Web Title:  The 'Agricultural Service Center's License Cancellation'