शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

संपाचा लढा आणि तिढा; मुंबईत १० हजारांहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या, परिवहन मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2021 04:16 IST

परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही.  

मुंबई :एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी तीन आठवड्यांपासून कर्मचाऱ्यांचा संपाच्या माध्यमातून लढा सुरूच असून शनिवारी सुमारे १० हजार कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांसह आझाद मैदानात ठाण मांडले. दुसरीकडे राज्य सरकारबरोबर आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र त्यातून अजून तोडगा निघालेला नाही.परिवहनमंत्री अनिल परब यांनी शनिवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर आणि ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, या बैठकीतही तोडगा निघाला नाही.  हायकाेर्टाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालावर सकारात्मक निर्णय घेऊ. विलीनीकरणाबाबत महाधिवक्त्यांशी चर्चा करू, असे आश्वासन परब यांनी दिले आहे. आतापर्यत २ हजार ९३७ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. कधीकाळी देणारे हात झाले आता मागणारे/स्टेट पोस्ट

कुणाच्या तरी भडकावण्यावरून आंदाेलन करू नका. आंदाेलनामुळे प्रवासी एसटीपासून दूर गेला तर ताे एसटीकडे पुन्हा आकर्षित हाेणार नाही. त्यामुळे भविष्यात माेठ्या संकटांना सामाेरे जावे लागेल. कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर कामावर यावे.    - अनिल परब, परिवहनमंत्री

चर्चेनंतरही संपावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे विलीनीकरणाबाबत महाधिवक्त्यांबरोबर चर्चा करण्याची सूचना केली.- ॲड. गुणरत्न सदावर्ते, कर्मचाऱ्यांचे वकील

लक्ष्य फक्त विलिनीकरणगावगाड्यातील एसटी कर्मचारी हा न्यायहक्काचा लढा लढत आहे. पण खाजगीकरणाची अफवा पसरवली जात आहे. ही मालमत्ता तुमची नाही, महाराष्ट्राच्या जनतेची आहे. आता अर्जुनाप्रमाणे लक्ष्य फक्त विलिनीकरण ठेवा. - सदाभाऊ खोत, माजी मंत्री, संस्थापक, रयत क्रांती संघटना

आम्ही तुम्हाला फक्त विलीनीकरण करा असे म्हणत नाही, तर पर्यायही देत आहोत. विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला पर्याय दिला आणि जे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळते तेच एसटी कर्मचाऱ्यांना कसे मिळू शकते, हे सांगितले आहे.- गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप

महामंडळात एकूण ९२ हजार २६६ कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी सात हजार ३१५ कर्मचारी कामावर हजर झाले. शनिवारी सायं. ६ पर्यंत राज्यात १४३ एसटी धावल्या.

टॅग्स :ST Strikeएसटी संपstate transportएसटीState Governmentराज्य सरकारAnil Parabअनिल परब