पुणे आयुक्त कार्यालयावर अभियोग्यता धारकांचा मोर्चा; रखडली २४,००० जागांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 01:12 IST2019-02-11T01:12:11+5:302019-02-11T01:12:43+5:30
मुंबई : राज्यात शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतप्त अभियोग्यता धारकांनी थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा ...

पुणे आयुक्त कार्यालयावर अभियोग्यता धारकांचा मोर्चा; रखडली २४,००० जागांची भरती
मुंबई : राज्यात शिक्षक भरतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतप्त अभियोग्यता धारकांनी थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. १२ फेब्रुवारी रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयावर बेरोजगार अभियोग्यताधारक धडक मोर्चा काढणार आहेत. या धडक मोर्चात सहभागी होण्यास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून किमान १,००० अभियोग्यताधारक येतील, अशी माहिती या मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहणारे अभियोग्यता उमेदवार कल्पेश ठाकरे यांनी दिली आहे.
राज्यात डी. एड आणि बी.
एड झालेल्यांची संख्या खूप मोठी आहे. शिक्षक भरतीसाठी
परीक्षा घेऊन १४ महिने उलटले, तरी घोषित केलेल्या २४,००० जागांची भरती होत नाही. म्हणून बेरोजगार अभियोग्यताधारकांमध्ये भयंकर
संताप आहे. या संतापाचाच परिणाम हा मोर्चा असणार असल्याचे अभियोग्यताधारकांनी म्हटले आहे. शिक्षण विभागाकडून १५ जिल्ह्यांत शिक्षकभरती पहिल्या टप्प्यात
जाहीर केली आहे. मात्र, आमची मागणी सर्व जिल्ह्यांतील रिक्त
पदे एकाच वेळी भरावीत अशी
आहे. त्यामुळे सनदशीर मार्गानेच,
पण आक्रमकपणा ठेऊन आम्ही आयुक्त कार्यालयावर धडकणार आहोत, असे कल्पेश ठाकरे यांनी सांगितले.
समाजमाध्यमांतून व्यक्त होतोय असंतोष
टिष्ट्वटरसारख्या समाजमाध्यमांमध्ये शिक्षकभरतीच्या मुद्द्यावरून मोठी चर्चा सुरू असून, प्रक्रियेबाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. टिष्ट्वटरवर शिक्षक भरती असे स्वतंत्र हँडल कार्यरत असून, शिक्षकभरती फसवणूक, शिक्षकभरती २४,०००, शिक्षकभरती पैसा जिंकला गुणवत्ता हरली असे हॅशटॅग मोठा प्रमाणात वापरले जात आहेत. त्यात मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लक्ष्य करून टिष्ट्वट केले जात आहेत.