शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सरकारविरोधात!!

By admin | Updated: March 10, 2015 01:44 IST

शेतक-यांच्या जमिनीच्या हक्कावर बहुमताच्या जोरावर अतिक्रमण करू नका, शेतकऱ्यांचा गळा आवळून सरकारला कायदा करताच येणार नाही

नवी दिल्ली : शेतक-यांच्या जमिनीच्या हक्कावर बहुमताच्या जोरावर अतिक्रमण करू नका, शेतकऱ्यांचा गळा आवळून सरकारला कायदा करताच येणार नाही, अशी क़णखर भूमिका शिवसेनेने भूमी संपादन विधेयकावरील चर्चेत घेतली. विरोधकांनी शिवसेनेच्या या भूमिकेचे बाके वाजवून स्वागत केले. विशेष म्हणजे, संसदेचे सभागृह ज्या जागेवर बांधले आहे ती जमीन शेतकऱ्यांना चिरडूनच ब्रिटीशांनी ताब्यात घेतल्याचा उल्लेख ऐकून अख्खे सभागृह हक्काबक्का झाले आणि शिवसेना प्रवक्ते खा. अरविंद सावंत आजच्या चर्चेतील हीरो ठरले!तब्बल दहा मिनिटे सावंत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. तेव्हा या विषयातील बारकावे, महाराष्ट्राचे प्रश्न, शेतीचा विषय व सरकारचा शेतकरीविरोधीतील निर्णय हे सारेच मुद्दे सभागृहात गंभीरता निर्माण करून गेले. शिवसेनेने काही बदल सुचविले आहेत, ते सरकारने स्वीकारले तरच शिवसेना समर्थन करेल असेही स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनीही विरोधावर मते मांडून काही सूचना केल्या. ग्रामविकासमंत्री चौधरी वीरेंद्र सिंग यांनी हे विधेयक चर्चा व पारित करण्यासाठी लोकसभेत मांडले. शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम आहे की बदलली याकडे संपूर्ण सभागृहाचे लक्ष होते. अरविंद सावंत यांनी विधेयकाच्या सध्याच्या मसुद्याला पक्षाचा विरोध आहे, असे सांगून म्हटले, त्यातील तरतुदी शेतकरीविरोधी आहेत. संसद, राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी ब्रिटिशांनी तेव्हाच्या पंजाब राज्यात असलेल्या गावातील शेतकऱ्यांना जबरदस्तीने हुसकावले. २३ शेतकऱ्यांचा बळी गेला. अशाच पध्दतीने केंद्र सरकार आता शेतकऱ्यांबाबत वागत आहे. विधेयकात त्यांच्या हक्कांवर बाधा आली आहे. महाराष्ट्रातील कोयना, गोसीखुर्द, मराठवाडा कृषि विद्यापीठ, मुंबईला पाणी देणारा वैतरणा अशा प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. पण ७५ टक्के प्रकल्पग्रस्तांचे अजूनही पुर्नवसन झालेले नाही. उद्योगासाठी उद्योगपती मोठ्या प्रमाणात जमिनी घेतात, पण कालांतराने तिथे घरे उभी होतात. त्यातून नफा मिळविला जातो. शेतकरी भरडला जातो. सरकारने पारदर्शी पध्दतीने हे विधेयक मांडले तरच शिवसेना समर्थन करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. भूमि संपादन विधेयक पारदर्शी नाही, शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांच्या मान्यतेशिवाय जमिनी घेऊ नयेत, असे म्हटले. तसेच भूमि संपादनासाठी महाराष्ट्रातील ज्या चांगल्या योजना आहेत, त्या देशात लागू करण्याचा आग्रह धरला. (विशेष प्रतिनिधी)