शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ओखी चक्रीवादळाच्या इशा-यानंतर उद्या मुंबईसह ठाण्यातील शाळा बंद, विनोद तावडे यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 22:36 IST

मुंबईच्या किनाऱ्यावर घोंगावणाऱ्या ओखी वादळामुळे शिक्षण विभागाने मुंबई महानगर प्रदेश, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड व पालघर  जिल्ह्यातील शाळा व कॉलेज बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.

मुंबई - मुंबईच्या किना-यावर घोंगावणा-या ओखी वादळाच्या इशा-यानंतर मुंबई महानगर क्षेत्रासह ठाणे, पालघर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी उशिरा जाहीर करण्यात आला. दरम्यान, या जिल्ह्यांतील महाविद्यालये आणि विद्यापीठ सुरूच राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी दिली आहे.याआधी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सायंकाळी यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. हवामान खात्याने ओखी वादळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिना-यांवर धोक्याचा इशारा दिला आहे. परिणामी, खबरदारीचा उपाय म्हणून फक्त मंगळवारी समुद्रकिना-यालगतच्या जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करत असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. मात्र अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू असल्याची माहिती मिळताच तावडे यांनी निर्णय बदलला. केवळ शाळांना सुटी देत असल्याचे ट्विट त्यांनी केले. यासंदर्भात विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार होतील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी दिली. दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालय सुरू राहणार असल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना दिली. चव्हाण यांनी सांगितले की, मंगळवारच्यासुट्टीमुळे होणारे शैक्षणिक नुकसान इतर सुटीच्या दिवशी भरून काढण्याचे आदेश शाळा व महाविद्यालय प्रशासनाला देण्यात आले आहेत. संबंधित शाळा व महाविद्यालय त्यांच्या सोयीने हे शैक्षणिक नुकसान भरून काढतील. तरी बुधवारी नियमित वेळेनुसार सर्व शाळा व महाविद्यालय सुरू राहतील..................................अफवांमुळे विद्यार्थी व पालक संभ्रमातहवामान खात्याने ओखी वादळामुळे मुंबईतील समुद्रकिना-यांना धोक्याचा इशारा दिला होता. सोबतच पश्चिम भागात पाऊस आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणाचा अंदाजही वर्तवला होता. मात्र ओखी वादळामुळे मुंबईभर जोरदार वादळ आणि मुसळधार पाऊस पडण्याची अफवा दुपारपासूनच सोशल मीडियावर पसरली. त्यात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालय बंद ठेवत कामगारांना सुट्टी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, या अफवेची भर पडली. अखेर सायंकाळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी समुद्रकिना-यालगतच्या जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना सुटी घोषित केली. मात्र नेमक्या कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा, यासंदर्भात नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.उद्या इंजिनियरिंगचे पेपर होणारओखी वादळाच्या धोक्यामुळे मुंबईसह समुद्रालगतच्या जिल्ह्यांतील शाळा व महाविद्यालयांना उद्या प्रशासनाने सुट्टी जाहीर केली असली, तरी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना मात्र यातून वगळण्यात आले आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा सुरू आहे. या परीक्षा पुढे ढकलणे शक्य नसल्याने त्या वेळेत होतील. मात्र अन्य महाविद्यालयांना उद्या सुट्टी असेल.

विद्यापीठाच्या सर्व परीक्षा नियोजित वेळेनुसार होतील.- डॉ. अर्जुन घाटुळे,संचालक, परीक्षा व मूल्यमापन

विद्यापीठ आणि महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू असतील.- डॉ. दिनेश कांबळे,कुलसचिव

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे