शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार-अजित पवार गुप्त भेटीनंतर काँग्रेस सावध, हायकमांडचं लक्ष, पटोलेंनी दिले असे संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 16:42 IST

Sharad Pawar-Ajit Pawar Secret Meeting: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि पक्षात बंडखोरी करून भाजपाशी हातमिळवणी करणारे अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि पक्षात बंडखोरी करून भाजपाशी हातमिळवणी करणारे अजित पवार यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. या भेटीबाबत शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र तरीही राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच शरद पवार यांच्या मनातन नेमकं चाललंय काय, याबाबतही अंदाज घेतला जात आहे. दरम्यान, या भेटीनंतर राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसनेही सावध भूमिका घेतली आहे. अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे, काँग्रेस हायकमांडदेखील यावर लक्ष ठेवून आहे, असे सूचक विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. 

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीबाबत विचारले असता नाना पटोले म्हणाले की, अशा भेटीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. त्यांचे नातेवाईक आहेत तर घरी भेट घेता येते, पण गाडीत झोपून  जाणे आणि गुप्तपणे बैठक घेणे कशासाठी? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या भेटीत यावर चर्चा करण्यात आली आहे. राहुल गांधी यांच्याबरोबरही चर्चा झाली असून त्यांना याबाबत माहिती दिली आहे. काँग्रेस हायकमांडदेखील यावर लक्ष ठेवून आहे. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत याबाबत त्यांच्याबरोबर चर्चा केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेवर निशाणा साधला आहे. उद्या आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासोबत चहा-पानाला बसू लागलो तर काय होईल. आम्ही नेत्यांनी त्यांच्यासोबत बसायचं आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात लढायचं, असलं ढोंग शिवसेनेच्या डीएनएमध्ये नाही, असे संजय राऊत यांनी सुनावले आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस