शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
3
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
4
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
5
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
6
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
7
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
8
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
9
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
10
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
11
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
12
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
13
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
14
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
15
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
16
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
17
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
18
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
20
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 17:50 IST

सप्टेंबरनंतर अनेक राजकीय घडामोडी बदलताना दिसतील. केंद्र सरकारमध्ये खूप उलथापालथ होताना दिसते असं त्यांनी सांगितले.

मुंबई - येत्या सप्टेंबर महिन्यात उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक पार पडणार आहे. सत्ताधारी NDA घटक पक्षांमध्ये सर्व सुरळीत आहे अशी चिन्हे नाहीत. तिथेच बऱ्याच उलथापालथी घडण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय एनडीएच्या उमेदवाराला सत्तेतील घटक पक्ष फारशी मदत करताना दिसत नाहीत. त्यामुळेच येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बरेच राजकीय बदल घडतील अशी शक्यता असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.

अंजली दमानिया यांनी म्हटलं की, केंद्र सरकारमध्ये सध्याच्या घडीला फार मोठे बदल घडताना दिसतात. तिथे सत्तेची गणिते बिघडलेली दिसतात. उपराष्ट्रपति‍पदाची निवडणूक आहे, त्यात NDA उमेदवाराला सत्तेतील घटक पक्ष समर्थन देताना दिसत नाहीत. त्यामुळेच मविआ नेत्यांसोबत बोलण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. त्यात एकनाथ शिंदे स्वत:ची ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसतायेत. कॅबिनेटच्या बैठकीलाही ते गेले नाहीत असं बोलले जाते. अनेक गोष्टी आणि अनेक बदल येत्या काही दिवसात घडताना दिसतील असं त्यांनी म्हटलं. 

तसेच सप्टेंबरनंतर अनेक राजकीय घडामोडी बदलताना दिसतील. केंद्र सरकारमध्ये खूप उलथापालथ होताना दिसते. त्याचेच पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसतात. देवेंद्र फडणवीसांना त्यासाठीच जबाबदारी दिलेली आहे. आताच्या घटकेला एकनाथ शिंदे यांना स्वत:सोबत ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. सध्याच्या घडामोडीत एकनाथ शिंदे यांचा भाव वाढेल परंतु सप्टेंबरनंतर काय होईल सांगता येत नाही असंही अंजली दमानिया यांनी सांगितले. टीव्ही ९ मराठीच्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. 

राज ठाकरे भाजपासोबत जातील...

दरम्यान, राज ठाकरे हे भाजपासोबत जातील असं वाटते. उद्धव ठाकरेंसोबत त्यांना भवितव्य नाही असं स्पष्टपणे दिसते. राज ठाकरे कधी ना कधी उद्धव ठाकरेंना तोंडघशी पाडतील. राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत जाणार नाहीत हे चित्र मला दिसत होते परंतु मी स्पष्ट बोलले नव्हते. आताच्या घटकेला भाजपासमोर स्वत:चा भाव वाढवण्यासाठी राज ठाकरे यांनी काही विधाने केली असतील. परंतु त्यांना उद्धव ठाकरेंसोबत जाण्याची कुठलीही इच्छा नसावी असं स्पष्टपणे वाटते असंही अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा