शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सुटीनंतर शाळेचा पहिला दिवस ‘गोड’ होणार

By admin | Updated: June 13, 2015 22:45 IST

दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर १५ जूनला राज्यातील शाळा सुरू होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू

पुणे : दीर्घ सुट्यांच्या आनंदानंतर १५ जूनला राज्यातील शाळा सुरू होत आहेत. हा दिवस विद्यार्थ्यांचा ‘गोड’ जावा, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू असून त्यांचे फुले देऊन स्वागत करण्याबरोबर माध्यान्ह भोजनात गोडधोड देण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील एकही विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाशिवाय राहणार नाही, याची आम्ही काळजी घेतली असल्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण विभागाचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ७२९ शाळा आहेत. या शाळांची पहिल्या दिवसाची तयारी सुरू आहे. शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात आयोजिण्यासाठी शासनाने ९ जूनला अध्यादेश काढून काही सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात या पहिल्या दिवसाच्या स्वागताची तयारी झाली असल्याचे शिक्षण विभागाचे पशिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले. ३ लाख ८४ हजार ६०३ विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकेसर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते ८ वीच्या ३ लाख ८४ हजार ६०३ विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थपान समितीच्या उपथिस्तीत मोफत पाठ्यपुस्तके वाटण्यात येणार आहेत. मराठी माध्यमाच्या सर्वाधिक ४ लाख ६० हजार २९१ विद्यार्थ्यांना, उर्दू माध्यमाच्या ७ हजार ३४९ विद्यार्थ्यांना, इंग्रजी माध्यमाच्या १३ हजार ९३२ व हिंदी माध्यमाच्या ३ हजार ३१ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटण्यात येणार आहेत. हिंदी माध्यमाचे फक्त हवेली तालुक्यात ३ हजार ३१ विद्यार्थी आहेत. माझी शाळा आदर्श व आनंददायी करीन- ग्रामस्थ, पालक आणि शाळा व्यवस्थपान समिती सदस्य यांची एकत्र बैठक घेऊन सर्व शिक्षक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देणारी प्रतिज्ञा देण्यात येणार आहे. तसेच २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्याच्या सूचनाही शाळांना दिल्या आहेत. शाळापूर्व दिनी घर भेट अन् पदयात्रा-१४ जून रोजी शाळा पूर्वतयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यात घरभेटी व शैक्षणिक पदयात्रा काढण्यात येणार आहेत. -यात सकाळी ७ वाजता सर्व क्षेत्रीय अधिकारी व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून प्रवेशपात्र बालकांची याची ग्रामपंचायत तसेच शाळा फलकावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. -त्यानंतर ध्वनिवर्धकावर सोमवारी आपल्या बालकांना सकाळी ७ वाजता शाळेत पाठविण्याची विनंती करून प्रवेशपात्र बालकांची यादी घोषित करण्यात येणार आहे. -शिक्षकांचे गट करून घरभेटी दिल्या जाणार आहेत. यात त्या घरात प्रवेशपात्र बालक असेल तर त्याचे अर्ज भरून सोमवारी शाळा सुरू होणार असल्याचे सांगण्यात येणार आहे.