शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे जनतेचे हाल; राज्य सरकार मात्र मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 08:15 IST

इंधन दरवाढीचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र सरकारला मिळणार

मुंबई: घसरता रुपया आणि कच्चा तेलाचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत असल्यानं जनतेचे हाल होत असले, तरी यामुळे राज्य सरकारं मात्र मालामाल झाली आहेत. इंधन दर भडकल्यानं राज्य सरकारांचं उत्पन्न कोट्यवधी रुपयांनी वाढणार आहे. याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्र सरकारला मिळणार आहे. एसबीआय एसबीआयच्या अहवालातून याबद्दलची आकडेवारी समोर आली आहे. चालू आर्थिक वर्षात पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे राज्य सरकारांना 22,700 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रुपयाची घसरगुंडी सुरुच आहे. रुपया दररोज नवनवे निच्चांक गाठत असताना पेट्रोल, डिझेलचे दर नवा उच्चांक गाठत आहेत. या पार्श्वभूमीवर एसबीआयनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांमुळे राज्य सरकारांचं उत्पन्न किती वाढेल, याचा अंदाज यातून वर्तवण्यात आला आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात एक बॅरल कच्च्या तेलाची किंमत 78 डॉलर इतकी आहे. यामध्ये एक डॉलरची वाढ झाल्यास देशातील प्रमुख 19 राज्यांच्या महसुलात सरासरी 1,513 कोटी रुपयांनी वाढ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यास देशात त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होईल. कारण त्यामुळे महाराष्ट्र सरकारचा महसूल 3,389 कोटी रुपयांनी वाढेल. यानंतर दुसरा क्रमांक गुजरातचा असेल. गुजरातच्या महसुलात 2,842 कोटी रुपयांची वाढ होईल. राज्यांना अपेक्षेपेक्षा जास्त महसूल मिळणार असल्यानं त्यांना सर्वसामान्य जनतेला दिलासा देता येऊ शकेल, असं अहवालात म्हटलं आहे. राज्यांना अतिरिक्त महसूल मिळणार असल्यानं त्यांनी पेट्रोल, डिझेलचे काही प्रमाणात कमी केले, तरीही त्यांचं उत्पन्नाचं गणित बिघडणार नाही, असं अहवालात अधोरेखित करण्यात आलं आहे. राज्य सरकारं प्रति लिटर पेट्रोलमागे 3.20 रुपये आणि डिझेलमागे 2.30 रुपये इतकी कपात करुन जनतेला दिलासा देऊ शकतात, असं हा अहवाल सुचवतो.  

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात