शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"तुमच्याशिवाय अडलं नाही"; शरद पवार गटात जाणार म्हणणाऱ्या खडसेंना भाजपचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 14:27 IST

मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Eknath Khadse on BJP : आमदार एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगावमध्ये लावण्यात आलेल्या होर्डिंगवरुन राजकीय वर्तुळात  वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्टवादी शरद पवार गटातून पुन्हा एकदा भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरची चर्चा रंगल्यानंतर एकनाथ खडसेंनी केलेल्या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. भाजपामध्ये माझा प्रवेश झाला, पण घोषणा झालेली नाही, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. मी राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार असल्याचे खडसेंनी म्हटलं आहे. खडसेंच्या या विधानानंतर आता भाजपनेही याबाबत भाष्य केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या वाढदिवासानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो लावण्यात आले होते. त्यानंतर वेगळीच चर्चा सुरु झाली. या चर्चेवर एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं. एकनाथ खडसेंच्या या विधानावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलं आहे.

"भाजपमध्ये आपला प्रवेश करण्यात यावा, अशी विनंती मी भाजपकडे केली होती. मात्र, भाजपकडून पूर्ण प्रतिसाद मिळाला नाही. मी अजूनही राष्ट्रवादीचा आमदार आहे आणि शरद पवार यांनी मला राजीनामा देण्यास नकार दिला आहे. मी भाजपकडून प्रतिसादाची अजून काही दिवस वाट पाहील आणि नंतर माझ्या मूळ राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होणार आहे. जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये माझा भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला. पण, त्याला खाली विरोध झाल्याने तो जाहीर होऊ शकला नाही. त्यामुळे आता भाजपमध्ये राहणे उचित होणार नाही," असे खडसे यांनी म्हटले आहे. 

प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

"लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. जळगाव रावेरच्या रक्षा खडसे आणि दुसऱ्या स्मिता वाघ या दोन्ही जागा भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात महायुतीने निवडून आणल्या. त्यामुळे एकनाथ खडसेंशिवाय काही अडल्याचे लोकसभेला दिसलं नाही," असे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

"एकनाथ खडसेंच्या प्रवेशाबद्दल निर्णय झालेला नाही. पण, जळगावमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांचा त्यांच्या प्रवेशावर आक्षेप आहे. भाजप ही काही ये जा करणाऱ्यांचा पक्ष नाही. त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही पक्षात येणार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही राष्ट्रवादीत जाणार हे अभिप्रेत नाही," असंही प्रवीण दरेकर म्हणाले. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेBJPभाजपाSharad Pawarशरद पवारpravin darekarप्रवीण दरेकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस