शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

महिलेच्या मृत्यूनंतर पंढरपूर देवस्थानला आली जाग

By admin | Updated: June 26, 2016 19:30 IST

विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी येत्या महिनाभरात मंदिरात कायमस्वरूपी एक वैद्यकीय पथक आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार.

ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २६ - विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी येत्या महिनाभरात मंदिरात कायमस्वरूपी एक वैद्यकीय पथक आणि अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करण्यात येणार असल्याची माहिती मंदिराचे प्रभारी कार्यकारी अधिकारी आणि  संजय तेली यांनी सांगितले.
मंदिरात दर्शनासाठी आल्यानंतर हृदयविकाचा झटका आलेल्या राजूबाई भगवानदास राजानी (वय ६० रा. उल्हासनगर, मुबंई) यांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्याची गंभीर दखल मंदिर समितीने घेतली असून लागलीच त्यांनी वैद्यकीय पथक नेमण्यासाठी जाहिरात दिली आहे. सोमवारी इच्छुकांच्या मुलाखती होणार असून त्यातून एक एमबीबीएस, बीएएमस असलेले डॉक्टर दोन परिचारिका, दोन परिचारक (ब्रदर्स) असे पथक तैनात करण्यात येणार आहे.
मागच्या वर्षी  एका शालेय विद्यार्थ्यांनीला मंदिरातच सर्पदंश झाला त्यावेळीही तीला लागलीच प्रथोमोचार मिळाले नाही की रुग्णवाहिका मिळाली नाही मात्र साप बिनविषारी असल्याने अखेर मुलीचे प्राण वाचले, त्या आधी मंदिरात भजन करत बसलेल्या वारकºयाच्या मांडीवर मंदिराच्या छताचा दगड कोसळला त्यात ते जखमी झाले तर ज्ञानेश्वर सभामंडपाच्या तिस-या मजल्यावरून एक महिला भाविक गेल्या आषाढी वारीतच भोवळ येऊन खाली पडली होती . 
अशा अनेक घटना घडल्यानंतही प्रशानाकडून केवळ वैद्यकीय पथकांच्या चर्चा झाल्या मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. मात्र प्रांताधिकारी संजय तेली यांनी अखेर आज तातडीने वैद्यकीय पथकाच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे.
 
रुग्णवाहिकेसाठी बँकाकडून प्रस्ताव
मंदिराला रुग्णवाहिका देण्यासाठी काही बँकांनी मंदिराला प्रस्ताव पाठविला होता. मात्र अत्याधुनिक रुग्णवाहिकेसाठी मंदिर समितीने मागणी केल्याने एका बँकेचा प्रस्ताव बँकेकडूनच बारगळला होता तर काल (शुक्रवारीच) दुस-या बँकेचा प्रस्ताव बँकेने दिला असून अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे फोटोही प्रांताधिकारी तेली यांना पाठविले होते. संबंधीत बँकेने रुग्णवाहिका पंधरा दिवसात दान दिली नाही तर मंदिर समिती स्वत:च्या पैशातून रुग्णवाहिकी खरेदी करणार असल्याचे तेली यांनी सांगितले.