शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

टीकेच्या भडिमारानंतर अखेर मेधा खोले यांनी स्वयंपाकिणीविरुद्धची तक्रार घेतली मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2017 6:53 PM

खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांनी अखेर शनिवारी तक्रार मागे घेतली.

ठळक मुद्देनिर्मला यादव यांच्याविरूद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात केलेली तक्रार मागे घेतली.

पुणे, दि. 9-  खोटी जात सांगून ‘सोवळे मोडले’ म्हणून स्वयंपाकिणीविरुद्ध तक्रार करणा-या हवामान शास्त्र विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा विनायक खोले यांनी अखेर शनिवारी तक्रार मागे घेतली. सोशल मिडियासह समाजामध्ये टीकेची राळ उठल्यानंतर डॉ मेधा खोले यांनी निर्मला यादव यांच्याविरूद्ध सिंहगड पोलीस ठाण्यात केलेली तक्रार मागे घेतली. आता यादव पण तक्रार मागे घेणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. खोले यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पुण्यात सर्वत्र तीव्र पडसाद उमटले.  त्यांच्यावर सर्वस्तरातून टिकेचा भडिमार करण्यात आला. सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छतेशी असून त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. त्यामुळे डॉ. खोले यांनी दाखल केलेली तक्रार मागे घेऊन हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे, अशी भूमिका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने घेतली होती. 

यादव यांनी ‘कुलकर्णी’ आडनाव सांगून आपल्याकडे नोकरी मिळवली आणि सुवासिनी आहे, असे सांगून आपल्या घरी स्वयंपाक केला’, अशी तक्रार डॉ. खोले यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री नोंदवली होती. पोलिसांनी यावरून यादव यांच्यावर गुन्हाही दाखल केला आहे. तर ‘मी खोटे नाव सांगून नोकरी मिळवलेली नाही. उलट डॉ. खोले यांनी माझ्या घरी येऊन मला मारहाण केली,’अशी परस्परविरोधी तक्रार निर्मला यादव यांनी अभिरुची पोलीस ठाण्यात दाखल केली होती. 

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची भेट घेऊन खोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ‘देव बाटला, सोवळे मोडले’ म्हणून पोलीस ठाण्यात तक्रार करणाºया डॉ. खोले यांनी संविधानाचा अपमान केला असून त्यांच्याविरुद्धच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ब्रिगेडने केली होती. मराठा क्रांती मोर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसची युवती शाखा, शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने वेधशाळा व डॉ. खोले यांच्या घरासमोर निदर्शने केली. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी यादव यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराबाबत माहिती घेतली. या प्रकाराचा अंनिसच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. 

 सोशल मीडियावर यावरून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने दुपारीच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सोवळ्याचा संबध शुचिर्भूतता आणि स्वच्छता याच्याशी असून, त्याचा जातीशी काहीही संबंध नाही. फसवणुकीचा जो गुन्हा वृद्ध महिलेविरोधात दाखल करण्यात आला त्यांच्या वयाचा विचार करता खोले यांनी तक्रार मागे घ्यावी आणि हे प्रकरण सामोपचाराने मिटवावे ही आमची भूमिका असल्याचे महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष आनंद दवे यांनी सांगित

टॅग्स :Crimeगुन्हा