शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तीन कुटुंबे बहिष्कारमुक्त

By admin | Updated: October 30, 2015 01:23 IST

जादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.

संतोष कुंडकर, चंद्रपूरजादूटोणा करीत असल्याच्या संशयावरून गावाने बहिष्कृत केलेल्या तीन कुटुंबांना ‘लोकमत’च्या पाठपुराव्यानंतर अखेर न्याय मिळाला. बुधवारी रात्री गावकऱ्यांनी त्या तीन कुटुंबांना बहिष्कारातून मुक्त केले.‘लोकमत’ने २८ आॅक्टोबर रोजी या संबंधीचे वृत्त प्रकाशित केले होते. चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी या वृत्ताची दखल घेत, बुधवारी सायंकाळी मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबाराव महामुने आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरिभाऊ पाथोडे यांना तातडीने आंबोली येथे रवाना केले. तेथे महामुने यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली. सर्वप्रथम गोकुलदास मेश्राम, इंद्रजीत गावतुरे, आनंदराव नन्नावरे या बहिष्कृत कुटुंंब प्रमुखांची बाजू ऐकून घेण्यात आली. त्यानंतर गावकऱ्यांनही बोलण्याची संधी देण्यात आली. यावेळी बाबाराव महामुने यांनी गावकऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याबाबत माहिती दिली. हे कृत्य कसे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि त्याचे काय दुष्पपरिणाम होतील, हे पटवून दिले. त्यानंतर हरिभाऊ पाथोडे यांनी दीड तास गावकऱ्यांचे प्रबोधन केले. अखेर गावकऱ्यांनी आपली चूक कबूल करीत, आजपासून आम्ही त्या तीन कुटुंबांवरील बहिष्कार मागे घेत आहोत, असे जाहीर करून यापुढे गावातील एकोपा कायम राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे सांगितले. पोलिसांना तसे लेखी दिले. त्यामुळे बहिष्कार प्रकरणावर पडदा पडला.