Advocate Asim Sarode News: राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीमध्ये आता दुसरा टप्पा आला असून, काही ठिकाणी संपूर्ण नगरपालिका/नगरपंचायतींसाठी तर काही ठिकाणी प्रभागांचे मतदान आता २० डिसेंबरला होणार आहे. २१ डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे. तर विरोधकांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.
पुणे जिल्ह्यातील बारामती, अहिल्यानगरमधील कोपरगाव, देवळाली, नेवासा, पाथर्डी, लातूर जिल्ह्यातील रेणापूर, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, फलटण, सोलापूरमधील मंगळवेढा, यवतमाळ नगरपालिका, वाशिम नगरपालिका, चंद्रपूरमधील घुग्गुस, वर्धामधील देवळी, बुलढाणामधील देऊळगावराजा, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, हिंगोली जिल्ह्यातील वसमत, नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, सोलापूरमधील मंगळवेढा, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहे. यानंतर असीम सरोदे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे.
निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
नगर परिषद व नगरपंचायतीच्या काही निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने अचानक स्थगित केल्या आहेत. आपोआपच आता या निवडणुकांचा दुसरा मतदान टप्पा २० डिसेंबर रोजी होणार. यापार्श्वभूमीवर आवश्यक आहे की २ डिसेंबर ला पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यावर तेथील नगर परिषद व नगरपंचायती चे निकाल लगेच ३ डिसेंबर जाहीर न करता सगळे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावे. तसे करणे पारदर्शक व मोकळ्या वातावरणात प्रामाणिक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी या निवडणूक आयोगाच्या कायदेशीर बंधनकारक जबाबदारीचा भाग आहे, असे असीम सरोदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, कायदेशीर सल्ला घेऊन आणि सर्व बाजूंचा विचार करून या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १७(१ब) तरतुदीनुसार एखाद्या उमेदवाराने कोर्टात अपील केल्यास उमेदवाराला अर्ज माघे घेण्यासाठी ठराविक वेळ देणे गरजेचे होते. अन्यथा याचा संपूर्ण निवडणुकीवर याचा परिणाम झाला असता. यामुळे निवडणूक स्थगित करावी लागली असती. ठराविक नगरपालिकांच्या आणि सदस्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
Web Summary : Following the postponement of municipal elections, Asim Sarode urges the Election Commission to delay announcing first-phase results, ensuring transparency. He calls for simultaneous declaration of all results.
Web Summary : नगरपालिका चुनावों के स्थगन के बाद, असीम सरोदे ने चुनाव आयोग से पारदर्शिता सुनिश्चित करते हुए पहले चरण के परिणामों की घोषणा में देरी करने का आग्रह किया। उन्होंने सभी परिणामों की एक साथ घोषणा करने का आह्वान किया।