शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

‘दुष्काळी पॅकेज’ला प्रशासनाची हरकत

By admin | Updated: July 29, 2014 02:50 IST

राज्यात उशिरा का होईना समाधानकारक पाऊस होत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये आजही दुबार पेरणीचे संकट कायम आहे.

यदु जोशी, मुंबईराज्यात उशिरा का होईना समाधानकारक पाऊस होत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये आजही दुबार पेरणीचे संकट कायम आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे पॅकेज मंत्रिपातळीवर हालचाली सुरू असतानाच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र अशा पॅकेजला हरकत घेतली असल्याचे सूत्रांकडून समजते.३० जुलै रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुष्काळग्रस्तांना मदतीचा निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे. मात्र अशा प्रकारचे पॅकेज देण्यास प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हरकत घेतल्याचे समजते. प्रशासकीय सूत्रांनी सांगितले की, दुबार पेरणीचे संकट पहिल्यांदाच आलेले नाही. पेरणीच झालेली नसेल तर पॅकेज कोणत्या निकषांवर देणार? दुबार पेरणीही बऱ्याचदा यशस्वी होते. तेव्हा पॅकेज देण्याची घाई आता करू नये, असे मत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात मदत, पुनर्वसन विभागाच्या बैठकीत व्यक्त केले आहे. गेल्या चार वर्षांत राज्य शासनाने शेतकऱ्यांना पॅकेज देताना तब्बल १३ हजार २२३ कोटी रुपये खर्च केले. त्यातून दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना फारच कमी झाल्या. आताही पुन्हा एक पॅकेज देऊन फारसे काही साधेल, असे प्रशासनाला वाटत नाही. मात्र विधानसभा तोंडावर असल्यामुळे पॅकेज देण्याची तत्परता सत्ताधारी दाखवली जात आहे. त्यासाठी कसेही करून ही मदत निकषात बसविली जाणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लावण्यात आली आहे.