शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

मोदी जे पितात तेच ड्रिंक आदित्य ठाकरेंच्या पेल्यात; राऊतांनी पुन्हा मकाऊवरून टोले हाणले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 11:28 IST

या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. - संजय राऊत

काल मी एक ट्विट केले, त्याद्वारे एक फोटो प्रसिद्ध केला. मी त्यात कोणता पक्ष नेता, संघटना याचे नाव घेतले नाही. महाराष्ट्रातील जवाबदार व्यक्ती चीनच्या मकाऊ येथे जुगार खेळत होता, तिथे पिझ्झा खायला कोणी जात नाही. या गोष्टी केल्या पाहिजेत. मी कुठे म्हटले की तिथे बसणे गुन्हा आहे पण खोटे बोलणे गुन्हा आहे. मीही गेलोय मकाऊला. भाजपने हे अंगावर ओढून घेण्याची गरज नव्हती, असा टोला संजय राऊत य़ांनी लगावला आहे. 

काल रात्री मला कळाले की त्यांनी पोकर तिथे घेतले. ते काय असते हे मी समजून घेतले. साडे तीन कोटीचे पोकर घेतले त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. जे छायाचित्र प्रसिद्ध झाले त्यात कुटुंब कुठेही दिसत नाही. लंडनला आमदाराचे शिष्टमंडळ गेले, आमदारांना वाटलं अशाप्रकारच्या जागेचा अभ्यास करावा, असा टोला राऊतांनी भाजपा आणि बानवकुळेंना लगावला. 

आदित्य ठाकरे जे पीत आहेत ते डाएट कोक आहे. मोदी जे पितात तेच कोक आदित्य ठाकरे पितात. ईडी सीबीआय पोलीस असताना भाजप इतका का घाबरला? असा सवाल राऊतांनी केला. याचबरोबर आम्ही मानसिक रुग्ण आहोत. आपल्या सारख्या व्यक्तीपासून महाराष्ट्र वाचवायचा ही आमची मानसिकता आहे. दंगल घडवण्याची मानसिकता यांची आहे. लोकांना नैतिकतेच्या गोष्टी करणारी ही भारतीय जुगार पार्टी आहे. भाजप भ्रष्ट पार्टी आहे. निवडणूक अधिकारी, विधानभवन राष्ट्रपती हे काही करणार नाहीत. हे भाजपचे पोपट आहेत. यांच्या पाठीचा कणा मोडलाय. हे वरून आलेल्या आदेशाचे पालन करतात, असा आरोप राऊत यांनी केला. 

विधानसभा अध्यक्ष स्वत: वकील आहेत. त्यांना योग्य अयोग्य कळत नाही का? घटनाबाह्य सरकारला पाठींबा देत आहेत. ते घटनात्मक पदावर बसले आहेत. पंतप्रधान मोदी सांगतात पवारांनी  ७० हजार कोटीचा घोटाळा केला,पण त्या पवारांना मोदी मांडीवर घेऊन बसलेत. यावरून दिसते कोण मनोरुग्ण आहे. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून, असे फडणवीस यांचे झाल्याचा टोला राऊतांनी हाणला. 

मुख्यमंत्र्यांनी मुंबई साफ करावी, नाहीतर लवकरच महाराष्ट्राची जनता त्यांना साफ करेल. कलानगर येथून सुरूवात केलीय, कारण कलानगरवर त्याचे प्रेम आहे. सर्व काही कलानगरनेच दिलेय त्यांना, हे ज्या खुर्चीवर बसलेत तेही कलानगरचीच बदोलत. मुंबईसह महाराष्ट्र ज्या अदानीच्या घशात घालू इच्छितात त्याला आम्ही विरोध करतोय. धारावी तसेच मराठी माणसाला बेघर करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही आहोत, असे राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAditya Thackreyआदित्य ठाकरेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपा