Aditya Thackeray : आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्य' आदित्य ठाकरेच पेलणार? जोरदार मोर्चेबांधणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 11:09 AM2022-01-03T11:09:46+5:302022-01-03T11:10:29+5:30

Aditya Thackeray : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीबरोबरच राज्यात पुढील काळात शिवसेनेच नेतृत्व ठळकपणे आदित्य ठाकरे यांनाच पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Aditya Thackeray will be the Shiv Sena's lead in the upcoming elections? | Aditya Thackeray : आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्य' आदित्य ठाकरेच पेलणार? जोरदार मोर्चेबांधणी 

Aditya Thackeray : आगामी निवडणुकीत शिवसेनेचे 'धनुष्य' आदित्य ठाकरेच पेलणार? जोरदार मोर्चेबांधणी 

googlenewsNext

- अल्पेश करकरे

मुंबई : २०२२ या वर्षात मुंबईसह राज्यातील इतर महत्त्वाच्या महापालिकांतील आगामी निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचे नेतृत्व करत आहेत, पण सध्या उद्धव ठाकरेंची तब्येत आणि भविष्यात निवडणुका पाहता शिवसेनेत निवडणुकांची धुरा आदित्य ठाकरे यांच्या खांद्यांवर असणार आहे. तसेच, आणखी काही काळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीबरोबरच राज्यात पुढील काळात शिवसेनेच नेतृत्व ठळकपणे आदित्य ठाकरे यांनाच पुढे आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री पद आणि तब्येत यामुळे उद्धव ठाकरेंऐवजी आदित्य ठाकरे...
उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने आणि तब्येत बरी नसल्याने साहजिकच निवडणुकीचे व्यवस्थापन, रणनीती, उमेदवार निवड व प्रचाराच्या बाबतीत त्यांच्यावर मर्यादा येणार आहेत. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्यांसाठी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे आले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण व पर्यटन खाते असून ते मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी मुंबईतील अनेक विकासकामांमध्ये लक्ष घालणे सुरू केले आहे. मिठी नदी प्रकल्प, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प, मुंबई महापालिकेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न असो, आदित्य ठाकरे हे स्वत: ही कामे करून घेत आहेत. नगरसेवकांच्या कामाचा आढावा देखील ते घेत आहेत.त्याचप्रमाणे राज्यात ज्या ठिकाणी निवडणुका आहेत त्याठिकाणची ही ते तयारी करत आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेची पुढील सूत्रे त्यांच्यात हाती असतील हे जवळपास स्पष्ट आहे.

यापूर्वी अदित्य ठाकरे यांनी केलं होतं नेतृत्व
युवा सेनेचे प्रमुख म्हणून आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने विद्यापीठ व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका लढल्या आहेत. त्यात अनेक ठिकाणी शिवसेनेने चमकदार कामगिरी केली आहे. आदित्य ठाकरे यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेत अनेक युवा चेहरे सक्रिय झालेले आहेत. महापालिका निवडणुकीत त्याचा फायदा पक्षाला होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्याकडे महापालिका निवडणुकीची धुरा आल्यास भाजपसारख्या बलाढ्य पक्षाला ते कशी टक्कर देतात व महापालिकेत शिवसेनेकडून किती नव्या चेहऱ्यांना संधी देतात, याबद्दल उत्सुकता आहे.

पुढे आव्हान असणार आहे, त्यामुळे शिवसेना प्रयत्नशील
भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर आणि राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. राज्याच्या सत्तेतून बाहेर ढकलल्यामुळे भारतीय जनता पक्ष शिवसेनेवर कमालीचा नाराज आहे. मुंबईची सत्ता ताब्यात घेऊन शिवसेनेला उत्तर द्यायचे, अशी रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी पडद्यामागे सर्व प्रकारची मोर्चेबांधणी सुरू आहे. मनसेला सोबत घेण्याचाही भाजपचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीनंही वातावरण निर्मिती केली जात आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा गड राखणे हे शिवसेनेपुढे आव्हान असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर ठिकाणी देखील ज्या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आहे आणि उमेदवार निवडून येतात त्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Web Title: Aditya Thackeray will be the Shiv Sena's lead in the upcoming elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.