शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Cyclone Tauktae: कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई पाहतेय, विनाकारण घराबाहेर पडू नका: आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2021 5:33 PM

Cyclone Tauktae: मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

ठळक मुद्देआदित्य ठाकरेंनी घेतला परिस्थितीचा आढावाविनाकारण घराबाहेर पडू नका; आदित्य ठाकरेंचे आवाहन

मुंबई:तौत्के चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला असून अनेक ठिकाणी झाडं कोसळून मोठं नुकसान झालं आहे. राजापूर, रत्नागिरीच्या किनारपट्टीभागात सोसाट्याचा वारा सुरू असून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तौत्क चक्रीवादळ कोकण किनारपट्टीसह मुंबई जवळून प्रवास करणार आहे. त्यामुळे किनारपट्टीभागात प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रुममध्ये पोहोचून आढावा घेतला. मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले आहे. (aditya thackeray appeals mumbaikars to stay home safely during cyclone tauktae)

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या सूचनाही केल्या. वादळाची तीव्रता सायंकाळ किंवा रात्रीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ ११४ किमीच्या वेगाने रेकॉर्डब्रेक करत मुंबईवर आदळले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात मोठे चक्रीवादळ असून झालेल्या परिणामांचा आणि सद्यस्थितीचा आढावा घेत अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी यावेळी केले. 

विनाकारण घराबाहेर पडू नका

कधीही न पाहिलेलं चक्रीवादळ मुंबई आता पाहतेय. वादळची दिशा गुजरातकडे आहे, वाऱ्याचा वेग प्रचंड आहे, सखल भागात पाणी साचलंय, जम्बो सेंटर्सच्या मेंटेन्सनची कामं सुरु आहेत, रात्रीपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील, विनाकारण घराबाहेर पडू नका, हे वादळ आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच १६० मिमी, १२० मिमी पाऊस वादळ आणि वाऱ्यासह होत आहे. मनुष्यहानी होणार नाही, याची काळजी घेत आहोत. हायटाईड आहे, ती निघून जाईल, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. 

मोठी बातमी! तौक्ते चक्रीवादळात मुंबई हायजवळ बोटीवर 273 कर्मचारी अडकले; नौदल मदतीला धावले

बीकेसी कोव्हिड सेंटरचे नुकसान नाही

बीकेसी येथील कोव्हिड सेंटरचे मोठे नुकसान झालेले नाही. मात्र, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्‍हणून महानगरपालिका प्रशासनाने या कोविड केंद्रातील २४३ कोविड बाधित रुग्‍णांना शनिवारी रात्रीच इतर रुग्‍णालयांमध्‍ये सुरक्षितपणे स्‍थलांतरित केले आहे. महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांच्‍या निर्देशानुसार अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्‍या मार्गदर्शनाखाली योग्‍य ती सर्व कार्यवाही करण्‍यात आली आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळAditya Thackreyआदित्य ठाकरेState Governmentराज्य सरकारMumbaiमुंबई