शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाबरोबरच रेल्वे पोलिसांवर चोरांचा हल्ला

By admin | Updated: June 11, 2015 02:06 IST

प्रवाशाबरोबरच रेल्वे पोलिसांवरही (आरपीएफ) चोरांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री भार्इंदर स्थानकात घडली

मुंबई : प्रवाशाबरोबरच रेल्वे पोलिसांवरही (आरपीएफ) चोरांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री भार्इंदर स्थानकात घडली. यात प्रवासी आणि दोनपैकी एक रेल्वे पोलीस जखमी झाले. तरीही रेल्वे पोलिसांनी यात शिताफीने तीन चोरांना अटक केली. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास भार्इंदर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सुधीर मोरे ट्रेनची वाट पाहात होते. त्या वेळी प्लॅटफॉर्मवरील बँचवर बसल्यावर त्यांना अचानक डोळा लागला. हीच संधी साधत त्यांच्या शेजारी उभे असलेल्या तीन चोरांनी त्यांच्या खिशातून मोबाइल आणि पर्स काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मोरे यांना जाग येताच त्यांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांनी त्यांच्याकडून मोबाइल आणि पर्स हिसकावून घेण्यासाठी झटापट सुरू केली. या झटापटीत तीन चोरांपैकी एकाने मोरे यांच्या उजव्या कोपऱ्यावर चाकूने वार केला. यानंतर मोरे यांनी आरडाओरड सुरू करीत रेल्वे पोलिसांकडे (आरपीएफ) मदत मागितली. यासाठी त्यांनी फोनही केला. त्या वेळी ड्युटीवर असलेले आरपीएफचे उपनिरीक्षक भरतलाल, हेड कॉन्स्टेबल सुशील आणि कॉन्स्टेबल बालूप्रसाद हे घटनास्थळी पोहोचेले. त्यांनी पळणाऱ्या चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. यात एका चोराला रेल्वे पोलिसांनी पकडले. आपल्या सहकाऱ्याला पकडल्याचे पाहताच अन्य दोन चोर हे त्याला सोडविण्यासाठी आले आणि त्यांनी कॉन्स्टेबल बालूप्रसाद यांच्या उजव्या कोपरावर तर दुसऱ्या कॉन्स्टेबलच्या डाव्या हातावर चाकूने वार केले. तरीही अशा परिस्थितीत या सर्व चोरांना रेल्वे पोलिसांनी पकडून ठेवले आणि त्यानंतर अन्य रेल्वे पोलिसांशी संपर्क करून मदत मागवून तीन चोरांना जीआरपीच्या ताब्यात दिल्याचे पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.