शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श’ दिलासा : काँग्रेसमध्ये उत्साह,दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याच्या हालचाली

By अतुल कुलकर्णी | Updated: December 23, 2017 04:08 IST

टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.

मुंबई : टू जी घोटाळ्यातून काँग्रेस आरोपमुक्त झाली असतानाच, आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळा प्रकरणी उच्च न्यायालयाने प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना दिलासा दिल्याने, काँग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे.हिंगोलीचे खा. राजीव सातव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली चालू असताना, हा निर्णय आल्यामुळे चव्हाण यांचे पद अधिक बळकट झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वत:च्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौºयावर घेऊन जाणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटीलही अचानक आक्रमक झाले आहेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी थेट मुन्ना यादववरून मुख्यमंत्र्यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही राष्टÑवादीबाबत भाषा बदलत, यापुढे एकत्रित निवडणुका लढविल्या पाहिजेत, असा सूर आळविला आहे.२०१४च्या निवडणुकीत महाराष्टÑात भाजपाला जरी १२२ जागा मिळाल्या, तरी त्यांच्या मतांची टक्केवारी २७.८१ होती. त्याउलट दोन्ही काँग्रेसची एकत्रित टक्केवारी ३५.१९ एवढी होती.आता शिवसेनाही भाजपाच्या विरोधात असून, त्यांच्या मतांची टक्केवारी १९.३५ होती. याचा अर्थच भाजपाच्या विरोधात ५४.५४ टक्के मते होती, हे विसरून चालणार नाही, असे चव्हाण यांचे मत आहे.आज राज्यात कर्जमाफी, शेतकºयांच्या वीजबिलावरून सरकारच्या विरोधी वातावरण तयार झाले आहे. त्यातच गुजरातचा निकाल, टू जी घोटाळ्यातून काँग्रेसची मुक्तता, अशोक चव्हाण यांना मिळालेला दिलासा, राष्टÑवादीचे नेते आ. जयंत पाटील आणि आ. जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांना अशोक चव्हाणांची बाजू घेत दिलेल्या प्रतिक्रिया, यामुळे दोन्ही काँग्रेसमधील कटुता कमी होत चालल्याचे दिसून येते.मात्र, भाजपाच्या नेत्यांची मते वेगळी आहेत. जरी अशोक चव्हाण यांना दिलासा मिळाला असला, तरी आदर्शमध्ये त्यांनी आणि ज्या कोणी अधिकाराचा वापर करत, तेथे फ्लॅट घेतले, त्या आरोपातून त्यांची सुटका झालेली नाही, असे एका ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.आमचेही राजकीय डावपेच कमी पडत आहेत, असे सांगून, तो नेता म्हणाला, काँग्रेस, राष्टÑवादीचा ज्या दिवशी नागपुरात मोर्चा निघाला, त्याच दिवशी सिंचन घोटाळ्यात गुन्हे दाखल झाल्याने, भाजपा सुडाचे राजकारण करत आहे, असा संदेश आमच्या विरोधात गेला. तो आम्ही टाळू शकलो असतो, असेही तो नेता म्हणाला.बाळासाहेबांच्या चित्रपटाची तारीख सूचक-बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपट २३ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर झाले़ लोकसभा निवडणुका मे, जून २०१९ मध्ये होणे अपेक्षित आहे़ विधानसभा निवडणुका त्याच वेळी घेण्याचेही भाजपाच्या वरिष्ठांनी घाटले आहे़ त्यामुळे चित्रपटाची तारीख सूचक आहे़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस