अभिनेत्री निवेदिता सराफ रेल्वे प्रवासात उंदरांमुळे हैराण
By Admin | Updated: September 26, 2016 14:36 IST2016-09-26T14:36:41+5:302016-09-26T14:36:41+5:30
प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मुंबई-लातूर रेल्वे प्रवासात मनस्ताप झाला. लातूरला जाताना आणि येताना दोन्हीवेळा त्यांना वाईट अनुभव आला.

अभिनेत्री निवेदिता सराफ रेल्वे प्रवासात उंदरांमुळे हैराण
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मुंबई-लातूर रेल्वे प्रवासात मनस्ताप झाला. लातूरला जाताना आणि येताना दोन्हीवेळा त्यांना वाईट अनुभव आला. ट्रेनमधल्या उंदरांच्या उपद्रवाचा त्यांना फटका बसला. निवेदिता सराफ नाटकाच्या खेळासाठी लातूर एक्सप्रेसने लातूरला चालल्या होत्या.
एसी सेकंडक्लासचे त्यांचे तिकीट होते. झोपताना त्यांनी आपली पर्स डोक्याखाली ठेवली होती. त्यावेळी उंदराने त्यांची पर्स चक्क कुरतडून टाकली. सकाळी लातूर स्थानक आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. हे कमी म्हणून की काय, परतीच्या लातूर-मुंबई प्रवासात टीसीने त्यांचे आरक्षित बर्थ दुस-या प्रवाशाला देऊन टाकले तसेच रेल्वेला मुंबईला पोहोचायला तब्बल चार ते पाच तास विलंब झाला.
काही दिवसांपूर्वी याच मार्गावरुन धावणा-या एका ट्रेनमधील उपद्रवी उंदरांचे चित्रीकरण करुन रेल्वेकडे तक्रार करण्यात आली होती. पुन्हा निवेदिता सराफ यांनाही हाच अनुभव आल्यामुळे रेल्वेकडून आवश्यक पावले उचलण्यात आली नसल्याचे स्पष्ट होते.