नादुरुस्त एसटी धावल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 06:59 IST2019-06-19T04:21:03+5:302019-06-19T06:59:12+5:30
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांचा इशारा

नादुरुस्त एसटी धावल्यास अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
मुंबई : नादुरुस्त आणि गळक्या एसटी पावसाळ्यात धावत असताना अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नादुरुस्त आणि गळक्या एसटी आढळून आल्यास, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिला.
महाराष्ट्रातील २५० आगारांना पावसापूर्वी एसटीची कशाप्रकारे सुरक्षा घ्यावी, उपाययोजना करावी, अशा सूचना पाठविल्या आहेत. नवीन एसटीची बांधणी करताना, पावसाळ्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्याच्या सूचना कार्यशाळा व्यवस्थापक, मध्यवर्ती कार्यशाळांना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात नादुरुस्त, गळक्या एसटीमुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे प्रवासी खासगी गाड्यातून प्रवास करतात. त्यामुळे रावते यांनी अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक घेतली. पावसापूर्वी एसटी दुरुस्ती, देखभाल करून त्या चालविण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने आगार व्यवस्थापकांना दिले.