शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

वीज पुरवठा अधिका-यांवर कारवाई

By admin | Updated: March 12, 2015 01:35 IST

अकोला महानगरपालिका हद्दीतील इमारती व सोसायट्यांच्या परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरना वीज पुरवठा करणा-या

मुंबई : अकोला महानगरपालिका हद्दीतील इमारती व सोसायट्यांच्या परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत मोबाईल टॉवरना वीज पुरवठा करणा-या अधिका-यांवर येत्या दोन महिन्यात कारवाई करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत केली. अकोला महापालिका हद्दीतील इमारती व गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात उभारण्यात आलेल्या बेकादेशीर टॉवरबाबतचा तारांकित प्रश्न गोपीकिशन बाजोरिया यांनी उपस्थित केला होता. इंडस या मोबाइल कंपनीने शाळा, महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर टॉवर उभारले असून त्यासाठी आवश्यक परवानगी घेलली नसल्याने सदर कंपनीवर कारवाई करण्याची मागणी बाजोरिया यांनी केली. या प्रश्नाच्या उत्तरादाखल बोलताना रणजित पाटील म्हणाले की, अकोल्यात १४ रुग्णालय आणि ७ शाळांच्या परिसरात इंडस कंपनीने अनधिकृत टॉवर उभारले. सदर प्रकरणी उच्च न्यायालयाने कंपनीला प्रत्येक टॉवरमागे एक लाख रुपयाप्रमाणे २१ लाखांचा दंड ठोठावला. मात्र, या अनधिकृत टॉवरना वीज देण्याचा निर्णय घेणा-या अधिका-यांची चौकशी करण्यात येणार असून दोन महिन्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. बाजोरिया यांच्यासह जयंत पाटील, धनंजय मुंडे, प्रकाश बिनसाळे आदी सदस्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग नोंदवला. इंडस टॉवरप्रकरणी उच्च न्यायालयात भूमिका मांडण्यात अकोला महापालिका कमी पडल्याचा आरोप सदस्यांनी यावेळी केला. यावर अहवाल मागवू. तसेच न्यायालयीन लढ्यात महापालिकेकडून कुचराई झाल्याचेआढळून आल्यास संबंधित विभागाच्या अधिका-यांवर कारवाई करण्याचे आश्वासन रणजित पाटील यांनी दिले