पंढरपूरात प्रचारासाठी हाणामारी; एकमेकांविरुध्द गुन्हा दाखल
By Admin | Updated: November 17, 2016 22:04 IST2016-11-17T22:04:40+5:302016-11-17T22:04:54+5:30
दुस-यांच्या प्रचार सभेस गेल्याच्या कारणावरुन एकमेकात हाणामारी झाली असून याबाबत एकमेकांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पंढरपूरात प्रचारासाठी हाणामारी; एकमेकांविरुध्द गुन्हा दाखल
>
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 17 - दुस-यांच्या प्रचार सभेस गेल्याच्या कारणावरुन एकमेकात हाणामारी झाली असून याबाबत एकमेकांविरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उषा धर्मा कोळी (वय ४०, रा. अनिलनगर, पंढरपूर) यांना दुस-याच्या प्रचार सभेस का गेली असे म्हणून प्रताप नारायण गंगेकर, निखिल प्रताप गंगेकर, अक्षय प्रताप गंगेकर (सर्व. रा. अनिलनगर, पंढरपूर), यांनी मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरासमोर मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली आहे. अशी पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.
तसेच प्रताप नारायण गंगेकर (वय ५०, रा. अनिलनगर, पंढरपूर) यांच्या घरासमोर उषा धर्मा कोळी, विजय दिलीप फडतरे (दोघे रा. अनिल नगर, पंढरपूर) हे रात्री १० च्या सुमारास आले. प्रताप गंगेकर यांना शिवीगाळ व दमदाटी केली. अशी तक्रार गंगेकर यांनी पोलीसात दिली आहे. पुढील तपास पोहेकॉ. ननवरे करीत आहेत.