पार्किंगमधील गाळ्यांवर कारवाई

By Admin | Updated: August 5, 2016 02:00 IST2016-08-05T02:00:08+5:302016-08-05T02:00:08+5:30

२३ मजली इमारतीतील पार्किंगसाठी असणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे गाळे तयार करण्यात आले होते.

Action on the gates in the parking lot | पार्किंगमधील गाळ्यांवर कारवाई

पार्किंगमधील गाळ्यांवर कारवाई


मुंबई : महापालिकेच्या ई विभागातील डी. मटीमकर मार्गावरील अफिया टॉवर या २३ मजली इमारतीतील पार्किंगसाठी असणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे गाळे तयार करण्यात आले होते. याबाबतची तक्रार प्राप्त होताच या जागेचे महापालिकेच्या नियम व पद्धतींनुसार निरीक्षण करण्यात येऊन निष्कासनाची नोटीस देण्यात आली होती. मात्र संबंधितांद्वारे याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने हे अनधिकृत बांधकाम तोडण्याची कारवाई महापालिकेच्या ई विभागाद्वारे करण्यात आली आहे.
नागपाडा परिसरातील अफिया टॉवर या २३ मजली इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या पार्किंगमध्ये अनधिकृत गाळे तयार करण्यात आल्याची तक्रार ई विभागाला प्राप्त झाली होती. त्या तक्रारीनुसार निरीक्षण करून व नोटीस देऊनदेखील कोणतीही कारवाई न करण्यात आल्याने हे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यासाठी महापालिकेचे कामगार, कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश असलेले ४० जणांचे पथक कार्यरत होते. तसेच ११ जणांचा समावेश असलेले मुंबई पोलीस दलाचे पथक या कारवाईवेळी कार्यरत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Action on the gates in the parking lot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.