आचार्य अत्रे यांनी मराठी रंगभूमीला सावरण्याचे काम केले - डॉ. सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 09:14 PM2019-08-13T21:14:08+5:302019-08-13T21:14:45+5:30

ज्यावेळी मराठी रंगभूमी अडचणीत होती आणि कुणीही सावरायला तयार नव्हते.. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी रंगभूमीला सावरण्याचे मोठे काम केले आहे.

Acharya Atre worked to preserve Marathi theater - Dr. sadanand More | आचार्य अत्रे यांनी मराठी रंगभूमीला सावरण्याचे काम केले - डॉ. सदानंद मोरे

आचार्य अत्रे यांनी मराठी रंगभूमीला सावरण्याचे काम केले - डॉ. सदानंद मोरे

googlenewsNext
ठळक मुद्देसासवड येथे २२ व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ

सासवड : आचार्य अत्रे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. कवी, विडंबनकार, राजकारणी, शिक्षणतज्ञ, पत्रकारिता, कादंबरीकार, नाटककार, साहित्यिक या सर्वच क्षेत्रात त्यांची मोठी छाप होती. जिथे हात लावला तिथे त्यांनी सोने केले. मराठी साहित्य चाळताना त्यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे त्यांचे साहित्यामध्ये काम होते. ज्यावेळी मराठी रंगभूमी अडचणीत होती आणि कुणीही सावरायला तयार नव्हते त्या वेळी आचार्य अत्रे यांनी रंगभूमीला सावरण्याचे मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने साहित्य संमेलने भरविणे हीच त्यांच्या कायार्ला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांही आचार्य अत्रे यांच्या कार्याचा जीवनपट उलगडला आहे.
सासवड ( ता. पुरंदर ) येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांच्या १२१ व्या जयंती निमित्त २२ व्या दोन दिवशीय आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ लेखक विश्वास वसेकर हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. यावेळी बोलताना आपल्या  साहित्याची सुरुवात आचार्य अत्रे यांच्या वर्तमान पत्रातून झाली. तर त्यांच्याच जीवन चरित्राचे माज्या हस्ते होणे यापेक्षा मोठा गौरव नसल्याचे डॉ मोरे यांनी सांगितले.

  या प्रसंगी स्वागताध्यक्ष शिवाजी कोलते, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा अध्यक्ष प्रकाश खाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, माजी जिप सदस्य सुदामराव इंगळे, उपनगराध्यक्ष संजय गं. जगताप, पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते, जय पुरंदरे, साहित्यिक बंडा जोशी, दशरथ यादव, आड. कलाताई फडतरे, प्रतिष्ठान चे सचिव शांताराम पोमण, प्रा. डॉ. नितीन घोरपडे त्याच प्रमाणे साहित्यिक प्रेमी उपस्थित होते.

   संमेलनाध्यक्ष विश्वास वसेकर यांनी सांगितले कि, आचार्य अत्रे यांच्यावर मराठी माणसाने अफाट प्रेम केले. अत्रेंच्या विनोदाला दुख आणि कडवटपणा नव्हता, तर त्यातील मार्मिकता समजून घेतली पाहिजे. सासवडची भूमी अत्यंत पावन अशी भूमी असून इथल्या मातीलाही सुगंधी दरवळ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, सभापती रमेश जाधव, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. 
विजय कोलते यांनी ओळख करून दिली, स्वागताध्यक्ष आड. शिवाजी कोलते यांनी स्वागत केले, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सचिव शांताराम पोमण यांनी केले, तर कलाताई फडतरे यांनी आभार मानले.

सासवड येथे २२ व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनास प्रारंभ.
सासवड : आचार्य अत्रे हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. कवी, विडंबनकार, राजकारणी, शिक्षणतज्ञ, पत्रकारिता, कादंबरीकार, नाटककार, साहित्यिक या सर्वच क्षेत्रात त्यांची मोठी छाप होती. जिथे हात लावला तिथे त्यांनी सोने केले. मराठी साहित्य चाळताना त्यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे त्यांचे साहित्यामध्ये काम होते. ज्यावेळी मराठी रंगभूमी अडचणीत होती आणि कुणीही सावरायला तयार नव्हते त्या वेळी आचार्य अत्रे यांनी रंगभूमीला सावरण्याचे मोठे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने साहित्य संमेलने भरविणे हीच त्यांच्या कायार्ला ख?्या अथार्ने श्रद्धांजली ठरेल. अशा शब्दात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांही आचार्य अत्रे यांच्या कार्याचा जीवनपट उलगडला आहे.
सासवड ( ता. पुरंदर ) येथे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे यांच्या १२१ व्या जयंती निमित्त २२ व्या दोन दिवशीय आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. जेष्ठ लेखक विश्वास वसेकर हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. यावेळी बोलताना आपल्या  साहित्याची सुरुवात आचार्य अत्रे यांच्या वर्तमान पत्रातून झाली. तर त्यांच्याच जीवन चरित्राचे माज्या हस्ते होणे यापेक्षा मोठा गौरव नसल्याचे डॉ मोरे यांनी सांगितले.

  या प्रसंगी स्वागताध्यक्ष शिवाजी कोलते, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखा अध्यक्ष प्रकाश खाडे, माजी आमदार अशोक टेकवडे, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, सभापती रमेश जाधव, उपसभापती दत्तात्रय काळे, माजी जिप सदस्य सुदामराव इंगळे, उपनगराध्यक्ष संजय गं. जगताप, पंचायत समिती सदस्य सुनिता कोलते, जय पुरंदरे, साहित्यिक बंडा जोशी, दशरथ यादव, आड. कलाताई फडतरे, प्रतिष्ठान चे सचिव शांताराम पोमण, प्रा. डॉ. नितीन घोरपडे त्याच प्रमाणे साहित्यिक प्रेमी उपस्थित होते.

   संमेलनाध्यक्ष विश्वास वसेकर यांनी सांगितले कि, आचार्य अत्रे यांच्यावर मराठी माणसाने अफाट प्रेम केले. अत्रेंच्या विनोदाला दुख आणि कडवटपणा नव्हता, तर त्यातील मार्मिकता समजून घेतली पाहिजे. सासवडची भूमी अत्यंत पावन अशी भूमी असून इथल्या मातीलाही सुगंधी दरवळ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी आमदार अशोक टेकवडे, सभापती रमेश जाधव, नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले. 
विजय कोलते यांनी ओळख करून दिली, स्वागताध्यक्ष आड. शिवाजी कोलते यांनी स्वागत केले, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सचिव शांताराम पोमण यांनी केले, तर कलाताई फडतरे यांनी आभार मानले.

Web Title: Acharya Atre worked to preserve Marathi theater - Dr. sadanand More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे