The accused attempted suicide in police custody in Pandharpur | पंढरपुरात पोलिस कस्टडीतच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

पंढरपुरात पोलिस कस्टडीतच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

ठळक मुद्दे- पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील घटना- घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल- आत्महत्येचा प्रयत्न करणाºया आरोपीवर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू

पंढरपूर : पंढरपूर येथील तालुका पोलिस ठाण्यामध्ये पोलीस कोठडीत असलेल्या एका आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास घडली आहे.

पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथील अर्जुन दिगंबर शितोळे यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती. पोलिसांच्या कस्टडीत असताना त्याने गुरुवारी पहाटे अडीचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला आहे.

दर माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ त्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संबंधित प्रकार समजताच अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी रुग्णालयात जाऊन शितोळे यांची प्रकृतीची विचारपूस केली़


 

Web Title: The accused attempted suicide in police custody in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.