शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात भीषण अपघात; पाच वऱ्हाड्यांचा मृत्यू, सहा गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 00:17 IST

लातूर  जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला.

लातूर - लातूर  जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचार करून उदगीर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील सोनकांबळे कुटुंबीय अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे लग्नसोहळ्यासाठी एका जीपने गेले होते. लग्नसोहळा आटोपून धामणगाव येथे येत असताना जामकडून शिरुर ताजबंदच्या दिशेने जाणा-या टेम्पोची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जीपमधील पाच वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. मयत व-हाडीमध्ये ज्ञानोबा सोनकांबळे (४०), अरविंद सोनकांबळे (३०), पुष्पा सोनकांबळे (४५), कांताबाई सोनकांबळे (५५), छकुली सोनकांबळे (६) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये आरोसी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनीता सोनकांबळे, रितेश सोनकांबळे, प्राची सोनकांबळे (सर्व रा. धामणगाव) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच जळकोट, चेरा आणि परिसरातील गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उदगीर येथे पाठवून दिले. अपघातामुळे शिरुर ताजबंद-मुखेड मार्गावर दोन कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

चिमुकली बचावली...जीपमधील व-हाडींमध्ये एक वर्षाची प्राची अरविंद सोनकांबळे ही होती. दरम्यान, टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. यावेळी चिमुकली जीपमधून बाहेर फेकली गेली. त्यामुळे ती जखमी झाली असून बालंबाल बचावली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये जीपचा चक्काचूर झाला आहे.

टॅग्स :AccidentअपघातlaturलातूरMaharashtraमहाराष्ट्र