बीड : परळी येथील मृत जवानाला सलामी देण्यासाठी निघालेल्या जवानांच्या गाडीला बीड-परळी राज्य रस्त्यावरील संगमजवळ अपघात झाला. यामध्ये दोघे गंभीर, तर ९ जण किरकोळ जखमी झाले. हे सर्व जवान अहमदनगर येथील लष्करी प्रशिक्षण केंद्रातील आहेत. जखमींवर अंबाजोगाईच्या स्वाराती व बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थिर आहे.परळी येथील मुरलीधर शिंदे या जवानाचा चंदीगढ येथे आजाराने मृत्यू झाला. रविवारी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात परळी येथे अंत्यसंस्कार होणार होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगरहून भारतीय लष्कराच्या १५ जवानांची तुकडी सैन्यदलाच्या वाहनातून परळीकडे निघाले होते. अचानक समोरून वाहन आल्याने चालकाने ब्रेक मारले. यामुळे वाहन उलटून रस्त्याच्या उजव्या बाजूस कलंडले. यामध्ये समोर बसलेल्या एका जवानासह पाठीमागील दहा-बारा जण जखमी झाले.
सलामी देण्यास जाताना जवानांच्या गाडीला अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 03:40 IST