शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील अपघातातून बचावलेल्या नाट्यदिग्दर्शकाने सांगितली घटनास्थळावरील कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 12:17 PM

भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे.

कोल्हापूर- गगनबावडा रोडवरील लेंघे गावाजवळ एका बसला अचानक आग लागली आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बस चालकाच्या प्रसंगावधानानं इतर 18 प्रवाशांचा जीव बचावला आहे. या भीषण अपघातातून वाचलेल्या सांगलीतील नाट्यदिग्दर्शक यशोधन गडकरी यांनी घटनास्थळी नेमकं काय घडलं? याबद्दलची कथा सांगितली आहे. यशोधन गडकरी हे गोव्यात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून परतत असताना अपघात झालेल्या बसने प्रवास करत होते.

23 नोव्हेंबरच्या संध्याकाळी इफ्फीतून सिनेमा पाहून निघाले होते. सांगलीत होणाऱ्या राज्यनाट्य स्पर्धेतील नाटकासाठी ते इफ्फीतून काल संध्याकाळी निघाले होते. पणजी बसस्टॅण्डवर आल्यावर त्यांची शेवटची म्हणजेच साडेनऊ वाजता असणारी बस चुकली. त्यानंतर त्यांनी खाजगी बसने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. पणजीत असणाऱ्या त्या बसमध्ये फक्त एकच सीट शिल्लक होती. बसमधील पॅसेज अत्यंत कमी होता त्यामुळे आपातकालीन परिस्थितीत कसा होणार? असा विचारही त्यांच्या डोक्यात आला. ती बस प्रवाशांना जेवणासाठी कुठेही थांबवणार नव्हती त्यामुळे यशोधन यांनी शौचालयाला जायचं खोटं कारण सांगून ते म्हापसामध्ये उतरले आणि ऑम्लेट घेऊन ते पुन्हा गाडीत आले. गाडीमध्ये ऑम्लेट खाल्ल्यानंतर त्यांनी झोपण्याचं ठरवलं. पण झोप लागल नव्हती. गाडी म्हापसावरून पुढे गेल्यावर दोन वृद्ध स्त्रीया गाडीमध्ये चढल्या. रात्री दीड-दोन वाजेच्या सुमारास त्यांना झोप लागली. झोप लागत असताना त्यांना झोपेत काहीतरी जळल्याचा वास आला, नाका-तोंडातही धूर गेला होता. डोळे उघडल्यावर संपूर्ण बसमध्ये धूर पसरलेला दिसला. 

बसमध्ये नेमकं काय घडतंय हे समजायचा आधीच यशोधन यांनी बसमधून बाहेर पडायची धडपड केली. बसच्या एक्झिटकडे पाहिल्यावर फक्त धूर दिसत होता. त्याच धुरात एका मानवी आकृतीने उडी घेऊन जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यावेळी बसला आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यशोधन यांनी लगेचच शूज, चष्मा व त्यांची बॅग सावरत बसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बसच्या दरवाजातून बाहेर उडी मारून रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतात धावलो व तेथे असलेल्या एका मंदिराचा सहारा घेतला. 

ड्रायव्हर-क्लिनरने प्रयत्न करूनही बसने पेट घेतला. घटनास्थळावरून हाका,गोंगाट, काचा फोडण्याचे आवाज ऐकु येत होते. बसमधून उड्या मारल्याने अनेकांना जखमा झाल्या होत्या.  मंदिरामागे यशोधन यांच्यासोबत इतर चार-पाच जण होती. त्यांनी  अंधाराच शेतातून गाडीच्या विरूध्द रस्त्याच्या उंचवट्याकडे गेले. १०-१५ मीटर पुढे अंधारात गेल्यावर समजलं. सर्वात मागे माझ्याच बाजूची चार तरूण पोरं आत अडकल्याचं समजलं.  पण एव्हाना गाडीने पूर्ण पेट घेतला होता. आता मागील फोडलेल्या काचांमधून दोघांनी बाहेर उड्या घेतल्या. २०-२५ मिनिटात गाडीचा फक्त सांगाडा दिसू लागला. या भीषण आगीत यशोधन यांच्या बाजूला असणाऱ्या दोघांना होरपळून मृत्यू झाला. बसला लागलेल्या भीषण आगीतून 14-15 जण सुखरूप वाचले.  

टॅग्स :Accidentअपघातfireआगkolhapurकोल्हापूर