शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
2
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
3
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
4
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
5
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
6
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
7
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
8
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
9
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
10
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
11
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
12
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
13
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
14
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
15
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
17
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
18
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
19
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
20
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

पाच अटी मान्य करा, मग उपोषण सोडतो, आरक्षणासाठी महिन्याची मुदत - मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 07:29 IST

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि समाजबांधवांच्या संमतीनुसार अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी शासनाला एक महिन्याचा वेळ दिला.

जालना - सर्वपक्षीय बैठकीतील निर्णय आणि समाजबांधवांच्या संमतीनुसार अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मंगळवारी शासनाला एक महिन्याचा वेळ दिला. शासनाला घातलेल्या पाच अटी मान्य केल्यानंतर आमरण उपोषण मागे घेऊ. परंतु, महिनाभर साखळी उपोषण करू. आरक्षण मिळेपर्यंत जागा सोडणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. 

अंतरवाली सराटीतील उपोषणाच्या  पार्श्वभूमीवर मुंबई येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत जे ठराव, निर्णय झाले त्याची माहिती घेऊन माजी मंत्री अर्जुन खोतकर, रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी मंगळवारी सकाळी जरांगे यांची भेट घेऊन शासनाचे पत्र दिले. त्यानंतर जरांगे यांनी भूमिका मांडली.

ते म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेणे, लाठीमार प्रकरणात अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा निर्णय झाला आहे. परंतु आरक्षणाचा विषय राहिला आहे. सर्वपक्षीयांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यास पाठिंबा दिला आहे. आपल्याला कायम टिकणारे आरक्षण हवे आहे. आरक्षणाच्या कायद्याची प्रक्रिया मोठी आहे. अभ्यासक, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार त्यासाठी वेळ द्यावा लागतो. एक दिवसात जीआर निघाला तर तो टिकणार नाही. आपण शासनाला एक महिन्याचा वेळ देऊ. परंतु ३१ व्या दिवसांनंतर आरक्षण मिळाले नाही तर महाराष्ट्राची बॉर्डर एकाही मंत्र्याला क्रॉस करू देणार नाही, असे जरांगे म्हणाले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी इथेच आंदोलन करणार आहे. मी घराचा उंबरठा ओलांडणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत मी मुलांचे तोंड पाहणार नाही.     - मनोज जरांगे, उपोषणकर्ते 

कोणत्या आहेत अटी ? - समितीचा अहवाल कसाही येवो, ३१ व्या दिवशी सरसकट मराठा समाजबांधवांना प्रमाणपत्र वाटप करायचे. - राज्यात आंदाेलकांवर दाखल सर्व गुन्हे मागे घ्यावेत.- लाठीमार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करावे - उपोषण सोडायला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यावे, छत्रपती संभाजीराजे, उदयनराजे भोसले यांना शासन आणि उपोषणकर्त्यांच्या मध्ये ठेवावे.

...तर ओबीसी परिषद काेर्टात आव्हान देणारमराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यास त्याला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ओबीसी संयुक्त परिषदेने केली आहे. सरकारने असा निर्णय घेतल्यास ६२ टक्के ओबीसी समाजावर अन्याय होईल, असे ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री शिंदे-जरांगे  मोबाइलवर चर्चामुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे यांच्यात मंगळवारी रात्री मोबाइलवर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने चर्चा झाली. शासनाला एक महिन्याचा वेळ दिला असून आता प्रत्यक्ष यावे म्हणजे आम्ही आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितल्याचे जरांगे म्हणाले.उपोषणाला यश येणार: भिडेशिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मंगळवारी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यांनी उपोषण थांबवावे, लढा थांबवू नये. राजकीय लोकांकडून पाहिजे ते करून घेण्याची जबाबदारी माझ्याकडे टाकावी. या लढ्याचा शेवट आरक्षण मिळवून होईल, असा विश्वासही भिडे यांनी व्यक्त केला.n सरकारने हे सर्व लेखी द्यावे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना