शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांच्या कार्यालयावर ACBचे छापे

By admin | Updated: June 16, 2015 13:54 IST

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोची वक्रदृष्टी वळली असून भुजबळ यांच्या एमईटी या संस्थेच्या नाशिक व मुंबईतील कार्यालयांवर आज सकाळी एकाचवेळी छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १६ - राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर अँटी करप्शन ब्युरोची वक्रदृष्टी वळली असून भुजबळ यांच्या एमईटी या संस्थेच्या नाशिक व मुंबईतील कार्यालयांवर आज सकाळी एकाचवेळी छापे टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्र सदनच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता, या प्रकरणी एकूण १७ जणांवर छापे टाकण्यात आले होते त्याच मालिकेत आता भुजबळ यांची भर पडली आहे.
भुजबळांच्या वरळी, दादर, भायखळा, दक्षिण मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणच्या भुजबळांच्या घरांवर व कार्यालयांवर एकाचवेळी कारवाई करण्यात आली असून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांच्या सांगण्यानुसार ही तर सुरुवात आहे. भुजबळांच्या याखेरीज आणखी अनेक मालमत्ता देशविदेशात असून त्यांची सगळी मालमत्ता बाहेर येईल.
तर, एका कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ यांनी मलाच नाही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाला गाडण्यासाठी द्वेषबुद्धीने केल्याची टीका केली आहे.
खोटा अहवाल ठेवणे, मर्जीच्या कंत्राटदाराला काम देणे, सरकारची दिशाभूल करणे, खोटे हिशेब दाखवणे, कंत्राटे देण्यासाठी पैसे स्वीकारणे असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. काही अधिका-यांवर बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी लाचचुचपत प्रतिबंधक विभाग कारवाई करण्यात आली असून आता भुजबळही अडचणीत सापडले आहेत.
राष्ट्रवादीही भाजपाचा अंतर्गत मित्रपक्ष असून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई होणार नाही अशी अटकळ बांधली जात होती, परंतु त्याला छेद देत राष्ट्रवादीच्या नमेत्यांवर कारवाई करण्यात येत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, कायद्याने व्यवसाय करून मालमत्ता कमवायला केवळ अंबानी अडानींना परवानगी नाही तर ती प्रत्येकाला आहे, त्यामुळे भुजबळांनी वैध मार्गाने संपत्ती कमावली असेल तर त्यात गैर काय  असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यांनी विचारला आहे. तसेच, भुजबळांना मुद्दामून गोवण्यात आले असून राष्ट्रवादी भुजबळांच्या ठामपणे पाठिशी असल्याचे मलिक म्हणाले.