शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

निधीअभावी रखडली प्रयोगशील शिक्षणाची वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 6:11 AM

शिक्षकांमध्ये नाराजीचाच सूर; फेब्रुवारीचा पंधरवडा संपत आला तरी शालेय शिक्षण विभाग उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रयोगशील शिक्षकांनी त्यांच्या शाळांमध्ये राबवलेले कृतिशील उपक्रम शाळांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शालेय शिक्षण विभागमागील काही वर्षांपासून राज्यात विविध ठिकाणी शिक्षणाची वारी हा उपक्रम राबवित आहे. यंदा नवीन सरकारकडून अद्याप या वारीच्या उपक्रमाला निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यातच आता परीक्षांचा कालावधी असल्याने हा उपक्रम राबविणे शक्य नाही. यामुळे यंदा शिक्षणाची वारी होणार नाही, असा नाराजीचा सूर शिक्षकांमध्ये आहे.राज्यातील १०० टक्के विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक विविध शैक्षणिक साधनांचा वापर करतात. कल्पक शिक्षकांच्या शैक्षणिक उपक्रमांचा उपयोग इतर शाळांमधील शिक्षक-विद्यार्थ्यांना व्हावा, तसेच विद्यार्थ्यांना कल्पकतेने शिकविण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शिक्षकांच्या कामालाही कौतुकाची पोचपावती मिळावी, हा शिक्षणाची वारी या उपक्रमामागील मूळ उद्देश आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम मागील काही वर्षांपासून दरवर्षी जानेवारी महिन्यात राबविला जात आहे. या वर्षी मात्र नव्या सरकारने अद्याप यासाठी कोणतेही नियोजन केलेले नाही. शिवाय जानेवारी उलटून फेब्रुवारीचा पंधरवडा संपत आला तरी यंदाच्या वारीसंदर्भात शालेय शिक्षण विभागाने अद्याप कोणताही निर्णय जाहीर केला नसल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.दरम्यान, सत्ताबदलानंतर नवीन योजना, समित्या आणल्या जात आहेत, हे स्तुत्य असले तरी सोबतच काही चांगल्या योजनाही बंद करण्याचा घाट घातला असल्याचा नाराजीचा सूर शिक्षकांमध्ये आहे.‘शिक्षणाची वारी’साठी देण्यात आलेला निधीवर्ष खर्च (रुपये) वारीचे ठिकाण२०१५-१६ २१,५९,६९२ पुणे२०१६-१७ १,१५,६२,०४३ पुणे, नागपूर, औरंगाबाद२०१७-१८ २,१२,०५,००० लातूर, अमरावती, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद२०१८-१९ २,२२,८४,०१० मुंबई, जळगाव, कोल्हापूर, वर्धा