शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मॅगी निर्यात करण्याची मुभा

By admin | Updated: July 1, 2015 03:35 IST

भारतात सध्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेले आपले ‘मॅगी नूडल्स’ हे उत्पादन मानवी सेवनासाठी योग्य असल्याविषयी कंपनीची खात्री असेल तर नेस्ले इंडिया

मुंबई : भारतात सध्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेले आपले ‘मॅगी नूडल्स’ हे उत्पादन मानवी सेवनासाठी योग्य असल्याविषयी कंपनीची खात्री असेल तर नेस्ले इंडिया कंपनी हवी तर मॅगीची देशाबाहेर निर्यात करू शकते, असे मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.नेस्ले कंपनीच्या नऊ प्रकारच्या मॅगी नूडल्सवर भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा मानक प्राधिकरणाने (एफएसएसआय)ने बंदी घातली आहे. याविरुद्ध कंपनीने केलेली रिट याचिका न्या. विद्यासागर कानडे व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठापुढे सुनावणीस आली तेव्हा प्राधिकरणाचे ज्येष्ठ वकील मेहमूद प्राचा यांनी या बंदीचे समर्थन करताना सांगितले की, एकट्या नेस्ले कंपनीविरुद्ध ही कारवाई करण्यात आल्याचा समज पसरविला जात आहे, पण तो चुकीचा आहे. प्रयोगशाळेतील तपासण्यांमध्ये ज्यांच्या नूडल्समध्ये शिशाचे प्रमाण निर्धारित मर्यादेहून जास्त आढळले अशा तीन कंपन्यांच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आली आहे.अ‍ॅड. प्राचा म्हणाले की, आमच्या बंदीमुळे कंपनीचे नुकसान होत आहे, या म्हणण्यात काही अर्थ नाही. आम्ही बंदी घालूनही मॅगी नूडल्स मानवी सेवनासाठी सुरक्षित आहेत, असे कंपनीचे म्हणणे असेल तर त्यांना त्याची भारताबाहेर निर्यात करण्यास आमची हरकत नाही. पण तयार असलेला माल नष्ट करावा लागण्याचा दोष कंपनी आम्हाला देऊ शकत नाही.यावर नेस्ले कंपनीचे ज्येष्ठ वकील इक्बाल छागला म्हणाले की, प्राधिकरणाचे असे म्हणणे असेल तर न्यायालयाने तशी नोंद करावी. अ‍ॅड. छागला यांनी असे सांगितले की, प्राधिकरणाने ५ जून रोजी बंदी घातल्यापासून कंपनीने आतापर्यंत मॅगी नूडल्सची १७ हजार कोटी पाकिटे बाजारातून परत घेऊन नष्ट केली आहेत. आणखी ११ हजार कोटी पाकिटे बाजारातून काढून घेण्याची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल.दरम्यान, अन्न सुरक्षा प्राधिकरण व अन्य प्रतिवादींनी कंपनीच्या याचिकेस उत्तर देणारी प्रतिज्ञापत्रे सादर केली. परंतु राज्य सरकारच्या वतीने माजी अ‍ॅडव्होकेट जनरल दरायस खंबाटा युक्तिवाद करणार असल्याने वेळ देण्याची विनंती करण्यात आल्याने न्यायालयाने पुढील सुनावणी १४ जुलै रोजी ठेवली. याआधी कंपनीने स्वत:च आपले वादग्रस्त उत्पादन दुकानांमधून परत घेतल्याने न्यायालयाने अन्न प्राधिकरणाच्या बंदीला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला होता. (विशेष प्रतिनिधी)